( गणपतीपुळे / वैभव-पवार )
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी नजीकच्या तरवळ ते चाफे मार्गावर ३३: केवी मेन लाईंनचे सुमारे १० ते १२ विद्युत पोल तुटून पडल्याने जाकादेवी ते गणपतीपुळे पर्यंतचा विद्युत पुरवठा गुरुवारी सायंकाळपासून पूर्णपणे खंडित झाला आहे. ई एच व्ही निवळी सबटेशनवरून येणारी इंनकमिंग३३ केव्ही लाईन चे पोल वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे गुरुवारी पडले. त्यामुळे जाकादेवी बरोबरच गणपतीपुळे पर्यंतची गावे गुरुवारी रात्री अंधारात राहिली. तसेच आज शुक्रवारी दिवसभर विद्युत पुरवठा बंदच राहीला आहे.
या मार्गावर महवितरणचे सुमारे दहा ते बारा विद्युत खांब पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. मात्र तरवळ येथे विद्युत खांब पडल्याने ते उभे करून विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी महावितरण कंपनीचे कर्मचारी युद्ध पातळीवर मोठी मेहनत घेत असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र एन दिवाळीत परतीचा मुसळधार पाऊस आणि खंडित होणारा विद्युत पुरवठा यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.