(रत्नागिरी / प्रतिनिधी)
राज्यात विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबरच्या चार वाजल्यापासून आदर्श आचारसंहितालागू करण्यात आली आहे . असे असतानाच रत्नागिरी शहर परिसरात अगदी जिल्हाधिकारी कार्यालयालगतच जयस्तंभनजीक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रसिद्धी करणारा बॅनर सायंकाळी उशीरा पर्यंत झळकत होता. यासंदर्भात बॅनरवरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे कोकण प्रदेश प्रभारी रोहित दयानंद तांबे यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
यासंदर्भात अधिक वृत्त असे की,दिनांक 15 रोजी आचारसंहिता राज्यभर लागू झालेली आहे तरीदेखील दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेतीन नंतरही ५:३० वाजेपर्यंत सर्वसामान्यजनतेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा बॅनर झळकत होता . जिल्हाधिकारी कार्यालयानजिकच जयस्तंभ येथे गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी हा बॅनर झळकत होता याकडे जिल्हाधिकारी यांनी का दुर्लक्ष केले अशी विचारणा करण्यात आली आहे. दरम्यान सायंकाळी ५ : ३० नंतरही शहरातील बॅनर काढण्याचे काम सुरु असल्याचे चित्रिकरण करण्यात आले असल्याचे तक्रारदारांकडून तसेच काही प्रत्यक्ष दर्शींकडून सांगण्यात येत आहे.
सर्वांचे बॅनर्स काढून झाले तरी सर्वसामान्य जनतेच्या मुख्यमंत्र्यांच्या बॅनरला विशेष समजून का ठेवण्यात आले अशी विचारणा तक्रारदारांनी केली असता आमच्याकडे शिडी नसल्याने तो बॅनर राहिला असल्याचे उत्तर देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे . त्यानंतर फायर ब्रिगेडच्या गाडीने सदरचे बॅनर काढण्याचे काम उशीरा पर्यंत सुरू होते. सदरच्या बाबीचे व्हीडीयो तसेच जिओ टॅगिंग फोटो तक्रारदारांकडे असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान गुन्हा नोंद करण्याची मागणी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया च्या (भाऊ निकाळजे गट ) कोकण प्रदेश संघटक रोहित तांबे यांनी केली आहे.