(रत्नागिरी)
इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद ए मिलाद म्हणून साजरा केला जातो. ईद ए मिलाद चे औचित्य साधून दावते इस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे जुलूस, रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर जुलूस, रॅली अतिशय शिस्तबद्ध पद्धती पणे काढण्यात आली.
या वेळी दुचाकी, चारचाकी वाहने सहभागी झाले होते सदर जुलूस उद्यमनगर, कोंकणनगर मारुती मंदिर ते उद्यमनगर मार्गे कोकणनगर येथे शेवट करण्यात आला. तसेच जुलूस मध्ये दावते इस्लामी शाखा रत्नागिरी चे सदस्य, उवेज जरीवाला, अली असगर अत्तारी तसेच इतर सर्व सदस्य उपस्थित होते. यानंतर सर्वांना नियाजचे वाटप करण्यात आले. रॅली सुरळीत पार पाडण्यासाठी रत्नागिरी शहर पोलिसांनी विशेष मेहनत घेतली.