(दापोली / सुदेश तांबे)
आज गुरुवार दि.23/01/2025 रोजी महेबुब बाबामिया नालबंद (वय 65 वर्षे, रा. साठीपोथरी मोहवा, खेड ता. खेड) हे सकाळी 10.00 वा.चे सुमारास खेडवरुन हर्णे येथे बैलाचे पायाला नाल मारण्याकरिता त्यांचे ताब्यातील मोटारसायकल क.एम.एच.08 एएफ-7067 क्रमांकाची दुचाकीवरून हर्णे येथे जात होते. ते कविजय लॉजिंग सालपुरे (ता. दापोली) या ठिकाणी 12.45 वा. चे दरम्याने आले असता हर्णे ते दापोलीकडे जाणारा आयशर टेम्पो एम.एच 08 ए.पी.6188 समोरुन येत असताना चालकाने वेगात येवुन दुचाकीला जोराची ठोकर दिली व अपघात घडला. या अपघातमध्ये महेबुब बाबानियों नालबंद हे गभीर जखमी झाल्याने त्यांना स्थानिक ग्रामस्थांनी खाजगी वाहनाने उपजिल्हारुग्णालय दापोली येथे दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी महेबुब नालबंद यांची तपासणी करुन ते मृत्यू झाल्याचे घोषीत केले.
सदरचा अपघात हा आयशार टेम्पो क्र. एम.एच.08 ए.पी.6188 वरील चालक शोएच महमंद शफी मुलानी, (वय-27 वर्षे, रा. हर्णे ता. दापोली) याने वेगात गाडी चालविल्यामुळे घडला असल्याचे महेबुब बाबामिया नालबंद यांचे भाऊ मन्सूर नालबंद यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे. या अपघाताबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.