(खेड)
येथील शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेतून कर्ज घेतलेल्या मात्र त्याची परत फेड करण्यासाठी कर्जदारांनी दिलेला धनादेश न वठल्याने या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात खेड न्यायालयाने दोन लाख रुपये दंड व तीन महिने साध्या कैदेची शिक्षा कर्जदाराला सुनावली आहे.
खेड येथील शिवचैतन्य सहकारी पतसंस्थेतून चंद्रकांत धोंडीबा बनकर यांनी कर्ज घेतले होते. परंतु ते परतफेड करत असताना त्यांनी दिलेला धनादेश वटला नाही. परिणामी पतसंस्थेने त्यांच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणी प्रथम वर्ग न्यायाधीश संजय मो. चव्हाण यांनी बनकर याला दोषी ठरविले तीन महिने साध्या कैदेची शिक्षा व दोन लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. बनकर यांनी एक महिन्याच्या आत दंडाची रक्कम न भरल्यास ३ महिने अधिकचा साधा कारावास भोगावायाचा आहे. ज्या रकमेचा धनादेश वठलेला नाही ती रकम ९ टक्के सरळव्याजाने न्यायालयात जमा करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी पतसंस्थेच्यावतीने ॲड. केतन पाटणे यांनी काम पाहिले. यावर सुनावणी करून न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.