(रत्नागिरी)
जिल्ह्यात रविवारी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसाचा महावितरणला जोरदार फटका बसला. वारा आणि पावसामुळे जिल्ह्यातील ८ गावांतील ८८ वितरण रोहित्रावरील वीजपुरवठा बाधित झाला होता. त्यामुळे ५,२०० ग्राहकांना अंधारात राहावे लागले.
जिल्ह्यात आडिवरे (धारतळे उपकेंद्र, राजापूर १ उपविभाग), पूनस (लांजा उपकेंद्र, लांजा उपविभाग), पानवल (पानवल उपकेंद्र, रत्नागिरी ग्रामीण उपविभाग), दाभोळ (दापोली उपकेंद्र, दापोली उपविभाग), नाटे (धारतळे उपकेंद. राजापर १ उपविभाग) या फिडरवरील आठ गावांतील ८८ वितरण रोहित्रावरील वीजपुरवठा बाधित झाला. त्यामुळे कृषी ५२०, अकृषी ४६८० ग्राहक मिळून ५२०० ग्राहक अंधारात होते.
लघुदाब वाहिनीचे ५३, उच्चदाब वाहिनीचे १८ वीजखांब वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे जमीनदोस्त झाले होते. त्यापैकी प्रत्येकी ७ वीजखांब पूर्ववत उभे करण्यात यश आले आहे. त्यामुळे कृषी ५८, अकृषी ५२० ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. महावितरण कंपनीतर्फे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत.