(चिपळूण)
तालुक्यातील पेढांबे-भराडेवाडी नं -१ या ठिकाणी वारंवार अपघातची मालिकाच सुरूच होती. सदर ठिकाण हे नागरिकांचे नेहमीचे वर्दळीचे आहे. भराडे नं -१ स्टॉप जवळच काही अंतरावर जि.प प्राथमिक, भराडे नं -१ शाळा आहे. शाळकरी मुले नेहमी या रस्त्याने ये-जा करीत असतात. यंदाच्या मे-जून मध्ये येथे ६-७ वेळा या ठिकाणी अपघात झालेला आहे. यामध्ये काही दिवसापूर्वी स्थानिक मुलाचा मृत्यूही ओढवलेला आहे. यामुळे शाळकरी मुले व वाडीतील नागरिकांमध्ये भरधाव वेगाने धावणाऱ्या गाड्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच गेली कित्येक दिवस गतिरोधक व्हावी, अशी स्थानिक रहिवासी यांची मागणी अखेर आता पूर्ण करण्यात आली आहे. यावेळी सामाजिक कार्याचा वसा घेतलेले व वाडीतील विधायक कामे मार्गी लावण्यासाठी वारंवार पुढाकार घेणारे श्री.योगेश पेढांबकर व वाडीतील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
चिपळूण-कराड हायवे असल्याने या ठिकाणी येणारी वाहने ही आता वेगात न येता आता धीम्या गतीने येत आहेत. त्यामुळे वेगावर नियंत्रण आले आहे. व गंभीर अपघात आळा बसला आहे. याबाबत कार्यकारी अभियंता, चिपळूण बांधकाम विभाग ,चिपळूण यांचे जिल्हाध्यक्ष, माहिती अधिकार निस्वार्थी चळवळ महा.राज्य यांनी व भराडे वाडीतील ग्रामस्थानी विशेष आभार मानले आहेत.
माहिती अधिकार रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री.योगेश पेढांबकर यांनी याबाबत .जिल्हाधिकारी यांची काही ग्रामस्थांच्या मदतीने कार्यालयीन भेट घेऊन झालेल्या अपघातातबाबत गतिरोधकासाठी विनंती केली होती. त्याप्रमाणे आता हा गतिरोधक पूर्ण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. भेटीदरम्यान गतिरोधक ज्याठिकाणी टाकण्यात आले आहेत. त्याच्या योग्य त्या अंतरावर नागरिकांना समजण्यासाठी “पुढे गतिरोधक आहे”असे फलक लावण्यात यावे, अशीही मागणी केली आहे.
या प्रसंगी वाडीतील ग्रामस्थ माहिती अधिकार जिल्हाध्यक्ष श्री.योगेश पेढांबकर मंडळाचे माजी सेक्रेटरी श्री.चंद्रकांत दाभीलकर , नवतरुण मंडळाचे उपाध्यक्ष श्री.रामदास सावर्डेकर, श्री.संजय सावर्डेकर ,श्री.विजय सावर्डेकर, श्री.सुरेश खेडेकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. विजया पेढांबकर, सौ. एकता पेढांबकर, सौ.अश्विनी सावर्डेकर, सौ.सुप्रिया पेढांबकर, कीर्ती पेढांबकर, सुचिता सावर्डेकर व अन्य वाडीतील सर्व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.