(चिपळूण)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कृषीभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी – पालवण अंतर्गत शेतकरी राजा संघाच्यावतीने ह.भ.प आ. बा. सावंत माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला.
आजकालच्या तरुण मुलांमध्ये खरी गुटखा, सिगारेट ओढण्याचे प्रमाण जास्त असून ते एक फॅशन बनली आहे. मात्र यामुळे कॅन्सर सारख्या भयानक रोग होऊन तो मृत्यूच्या दारात जातो व त्याच्या परिवारासोबत समाज, देश व जगाचे सुद्धा नुकसान होते. त्यामुळे आत्ताचा सर्व युवकांनी अंमली पदार्थाचे सेवन न करण्याची शपथ घ्यावी असे आवाहन गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालया अंतर्गत शेतकरी राजा संघाच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नायशी-कळंबूशी- वडेरू पंचक्रोशी शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक मा.श्री. श्रीधर घाग आणि कळंबुशी गावचे सरपंच मा.श्री सचिन चव्हाण तसेच विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री.आनंदा घाटगे सर व सर्व शिक्षक वर्ग व इतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी तंबाखू, सिगारेट, गुटखा यामुळे होणारे परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच व्यसनांमुळे होणारे आजार व समाजावर होणारा त्याचा परिणाम यांची माहिती दर्शवणारा व्हिडिओ शेतकरी राजा संघातर्फे विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखवण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी कु. रोहित कांबळे याने केले. तसेच कु. संकेत लोखंडे याने कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले व कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी कु. प्रशांत गाडे आणि नायशी विद्यालयाचे प्राचार्य श्री.घाटगे सर व श्री.माळी सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी कु. तनिष्क दुपारगुडे यांने मानले. याप्रसंगी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी अमली पदार्थ सेवन न करण्याची शपथ घेतली. सदर कार्यक्रम शेतकरी राजा संघाचे विद्यार्थी कु. दिप चौधरी, सुराज पांढरे, पृथ्वीराज अहिरेकर, अभिषेक भोसले, ओंकार क्षिरसागर, वेदांत बाबर, राहुल वाघमोडे, रविराज पाटील यांच्या आयोजनातून यशस्वीरित्या पार पडला.