(संगमेश्वर)
लहान वयातच स्वप्न पहिली तर लवकर यश मिळेल,असे प्रतिपादन प्रा.मिलिंद कडवईकर यांनी साखरी बुद्रुक-खुर्द येथे पार पडलेल्या करियर मार्गदर्शन शिबिरात केले. कुणबी एकता सामाजिक संघटना,साखरी बुद्रुक- खुर्द,ता.गुहागर यांच्यावतीने पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात प्रमुख वक्ते प्रा.मिलिंद कडवईकर यांनी करिअर निवडीचे टप्पे,करिअर निवडीवर परिणाम करणारे घटक,विविध अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या सीईटी परीक्षा,विविध करिअर पर्याय व यशस्वी होण्याचे मार्ग सविस्तरपणे समजावून सांगितले.