(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्रयोग शाळेला शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व कै. डॉ. नानासाहेब मयेकर प्रयोगशाळा असे नाव देऊन या नामफलकाचा उद्घाटन समारंभ मयेकर कुटुंबातील पाच महिलांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.
या उद्घाटन समारंभाप्रसंगी मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे धडाडीचे व उपक्रमशील चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर, शिक्षण संस्थेचे सचिव व मालगुंड विद्यालयाचे सीईओ विनायक राऊत, सहसचिव श्रीकांत मेहेंदळे,कोषाध्यक्ष संदीप कदम, शिक्षण संस्थेचे संचालक गजानन उर्फ आबा पाटील, संस्थेचे संचालक व जाकादेवी विद्यालयाचे सी.ई.ओ. किशोर पाटील, संचालक रोहित मयेकर, तसेच दिप्ती मयेकर, यशश्री पवार,नेहा मयेकर, बाबा मयेकर, बापू मयेकर, नंदकुमार यादव , शुभदा मयेकर, मुक्ता मयेकर,प्रशालेचे मुख्याध्यापक नितीन मोरे,पर्यवेक्षक शाम महाकाळ, मालगुंड विद्यालयाचे मुख्याध्यापक बिपीन परकर, काजुर्ली हायस्कूलचे मुख्याध्यापक आशिष घाग, सन्मान मयेकर, अभिमान मयेकर यांसह अनेक मान्यवर संस्थेचे हितचिंतक , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
जाकादेवी येथील बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयाला संलग्न जिल्हा नियोजन समितीतून उभारलेल्या प्रशस्त सभागृहात फिजिक्स ,केमिस्ट्री, बायोलॉजी शाखांसाठी नव्याने प्रयोगशाळेचे दालन उघडण्यात आले. या प्रयोगशाळेला कै. डॉ. नानासाहेब मयेकर असे नाव देण्यात आले. जिल्ह्यातील एक सुसज्ज आणि अद्ययावत लॅब जाकादेवी कनिष्ठ महाविद्यालयाची असेल असा आत्मविश्वासपूर्वक उल्लेख करून चेअरमन बंधू मयेकर यांनी या लॅबला डॉ.नानासाहेब मयेकर यांचे नाव देऊन समाधान वाटल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. या लॅबच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन,संशोधन वृत्ती वाढण्याबाबत बंधू मयेकर यांनी आशावाद व्यक्त केला.
शिक्षण संस्थेतील शिक्षकवर्ग ,पूर्ण स्टाफ हा एकजुटीने काम करत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी सौ. यशश्री पवार, किशोर पाटील, संदीप कदम, विनायक राऊत, कार्यक्रमाचे अध्यक्ष बंधू मयेकर यांनी आपल्या भाषणातून डॉ. नानासाहेब मयेकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच नामकरण सोहळ्यानिमित्त आपली मनोगतं व्यक्त करून नानांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी शिक्षक प्रतिनिधी अरूण कांबळे यांनीही नानांच्या कार्यावर प्रभावी काव्यपुष्प सादर केले.विद्यार्थी प्रतिनिधी सानिका बळकटे हिने प्रशस्त व अद्ययावत प्रयोगशाळा उपलब्ध करून दिल्याबद्दल शिक्षण संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार यांनी केले. स्वागत मुख्याध्यापक नितीन मोरे तर आभार पर्यवेक्षक शाम महाकाळ यांनी मानले.