(रत्नागिरी)
207 वा भीमा कोरेगाव शौर्य दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर फायटर फोर्स ऑफ इंडिया, रत्नागिरी शाखेच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटलच्या शेजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात साजरा करण्यात आला. सकाळी 11.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छोटेखानी वीर योद्धे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.
वीर शौर्यपुरुष यांच्या स्मृतींस अभिवादन करून बाबासाहेबांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली. या सभेचे अध्यक्ष स्थान मा. एल. व्ही. पवार यांनी भूषविले. प्रमुख वक्ते मा. दिपक जाधव, मा. अशोक गंगाराम पवार, यांनी शहीद शौर्य दिनावर मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मा. बी. के. पालकर यांनी केले. सदर विजय दिन आणि शूर योद्धे शौर्य अभिवादन सभेस बहुसंख्य अनुयायी उपस्थित होते.