(रत्नागिरी)
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली 41 वर्ष विविध माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनातून वैज्ञानिक दृष्टीकोन सामान्य माणसामध्ये रूजविण्याचे, राष्ट्रीय कार्य करीत आहे. भारतीय राज्यघटनेने लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, वाढवणे व विकसित करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. डॉ बाबासाहेबांचा हा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविण्यासाठी समितीच्या वतीने दिनांक 14 एप्रिलपासून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रबोधन यात्रेमध्ये पोस्टर प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, पदनाट्य गाणी व चमत्काराची प्रात्यक्षिके तसेच जाहीर व्याख्याने यांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. ही प्रबोधन यात्रा मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या परिसरामध्ये आयोजित केली जाणार आहे. ज्या सामाजिक संस्थांना आपल्या परिसरामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन व जादूटोना विरोधी कायदा सप्रयोग व्याख्यान आयोजित करायचे असल्यास मुंबई जिल्हा 9702195991, उपनगर 9869542282, ठाणे 9224570085, पालघर 9819526021, रायगड 8767149258, रत्नागिरी 7588968590, सिंधुदुर्ग 942097475 या दूरध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन अभाअनिस उपनगर जिल्हा संघटक सचिन हिंदळेकर यांनी केले आहे.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1