(मुंबई / रामदास धो. गमरे)
दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघ या संघाच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या पवित्र विवाह सोहळ्याचा वर्धापनदिन शुक्रवार दि. ४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ठीक ५:०० ते रात्री १०:०० या वेळेत भगवान तांबे यांच्या अध्यक्षतेखाली भायखळा मच्छीमार्केट जवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, भायखळा (पूर्व), मुंबई-२७ येथे आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमाला बाबासाहेब व रमाई यांचे नातू, बौद्धजन पंचायत समितीचे सभापती, सरसेनानी आनंदराज आंबेडकर, मनोज जामशीतकर (आमदार), यामिनी जाधव (माजी आमदार), कुणाल कांबळे (संपादक), महेंद्र गमरे (व्यवस्थापक महिला आर्थिक विकास महामंडळ) हे उपस्थित राहून आपले विचार व्यक्त करणार आहेत. दक्षिण मुंबई बौद्ध संघ सेवा संघाच्या वतीने सन २०१५ पासून आजतागायत प्रतिवर्षी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते वर्षभरात सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविले जातात याही वर्षी सालाबादप्रमाणे कार्यक्रमाची आखणी केली आहे,
सदर विवाह सोहळ्याच्या प्रारंभी सम्यक कोकण कला संस्था महाराष्ट्र या संस्थेचे कलावंत भीमगीतांची मैफिल सादर करून माता रमाई व बाबासाहेबांना मानवंदना देणार आहेत. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर देखील या विवाह सोहळ्याच्या वर्धापनदिनास उपस्थित राहणार आहेत. तरी तमाम जनतेने, आंबेडकरी अनुयायींनी सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे अशी विनंती दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाने काढलेल्या परिपत्रकात मोहन मर्चंडे, अनुराधा साळवे, भगवान तांबे यांनी केली आहे.