(आरोग्य)
उचकी कधीही आणि कोणालाही येऊ शकते. कोणी तरी आठवण काढत असेल म्हणून उचकी येते. पण आधुनिक विज्ञान या सर्व गोष्टींना मनात नाही कारण बऱ्याच वेळा हंगामी मौसम मध्ये बदल झाल्यावर किंवा शारीरिक बदल झाल्यावर देखील उचकी येते आणि ते साहजिक आहे. परंतु पाणी पिऊन किंवा लक्ष भरकटवून देखील उचकी थांबत नाही. अशा परिस्थितीत व्यक्ती अस्वस्थ होते. आपण उचकी येणे कशी थांबवू शकतो याची माहिती घेऊ.
मध खाणे
उचकी येत असताना मध खाणं फायदेशीर आहे कारणं अचानकपणे शरीराला मिळणारा मधाचा गोडपणा नसांना संतुलित करतो. ज्याप्रकारे प्रमाणे लहान मुलांना उचकी येते तेव्हा उपाय म्हणून त्वरितच त्यांना मधाचे बोट चाटवतात आणि ते पुन्हा खेळू लागतात. त्याच प्रमाणे जर मोठ्यांना उचकी येत असेल तर त्यांनी देखील मध खावे.
लिंबू चघळणे
जर आपल्याला देखील उचकी येत आहे आणि थांबतच नाही तेव्हा लिंबाचा एक चतुर्थांश तुकडा घेऊन थोड्या वेळ तोंडात ठेवा उचकी लगेच थांबेल आणि आपल्याला आराम मिळेल. बरयाचदा जे लोक मद्यपान करतात त्यांना अचानक उचकी आल्यावर लिंबू खाण्याचा सल्ला दिला जातो.
तोंडात बोट घालणे
हे जरी काहीसे विचित्र वाटेत असले तरी पण विश्वास ठेवा की हिचकी थांबविण्यासाठी हा एक खूप चांगला उपाय आहे. अचानक उचकी येत असेल आणि काहीच उपाय सुचत नसेल तर आपले बोट तोंडात घाला. पण ही प्रक्रिया करत असताना जास्त दाब आणू नका अन्यथा आपल्याला ढास येऊ शकते. हि प्रक्रिया जरा हळुवारपणे करा आणि त्वरित परिणाम बघा.
गुडघे छातीकडे वाकवणे
उचकी आल्यावर बसून हा प्रकार करा. पाय अशा प्रकारे दुमडा करा की गुडघे छातीला स्पर्श झाले पाहिजे. असे केल्यास फुफ्फुसांवर दाब पडतो आणि स्नायूंचे आकुंचन दूर होते. काही वेळ अशाच परस्थितीमध्ये बसून राहावे थोड्य वेदातच आपण बघाल की उचकी बंद झालेली असेल.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना या उचकीचा सामना करावा लागतो. आपल्या लहान बाळाला उचकी लागली की अनेक पालक धास्तावतात, त्यांना भीती वाटते. म्हणूनच आपण जाणून घेऊया की बाळाला उचकी का येते आणि उचकी येणे कोणत्या गोष्टीचा संकेत असतो का?
जेव्हा अचानक तोंडात हवा घुसून स्वर नलिकेमध्ये प्रवेश करते तेव्हा उचक्या सुरु होतात. या स्थितीमध्ये वोकल कोर्ड ज्या आपल्या गळयामध्ये असतात त्या लवकर बंद होतात आणि उचकीचा आवाज सुरु होतो. उचकी आल्यावर अजिबात घाबरून जाण्याचे कारण नाही.
बाळाची उचकी : ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि अनेक पालकांना हा प्रश्न सतावतो. अनेकदा लहान मुलांना थोड्या थोड्यावेळाने उचकी लागते. ज्यामुळे मुलं आणि पालक दोघंही हैराण होतात. जर दूध पिताना बाळाला उचकी लागली तर त्याला शांत करा. बाळाला
उचकी लागू नये म्हणून काय कराल
- बाळाला काहीही खायला घालताना, त्याला झोपून खायला देण्याचा प्रयत्न करा. उशीवर झोपूनही तुम्ही बाळाला दूध पाजू शकता. जेणेकरून तो सरळ राहतो आणि जेवताना तो कमी हवा आत घेतो.
- बाळाची उचकी थांबवण्याचा सर्वात सामान्य मार्ग म्हणजे ढेकर काढणे. जेव्हा तुम्ही दुसरं काही खाऊ घालत असाल तेव्हा बाळाला फुंकर घालण्याचा प्रयत्न करा.
- बाळाच्या तोंडात साखर घाला किंवा त्याला मधाचा चाटन द्या. जर मुलाने काहीतरी घन किंवा जड खाल्ले असेल तर याचा नक्कीच फायदा होईल.
- जेव्हा बाळाला वारंवार उचकी येऊ लागते तेव्हा त्याला तुमच्या मांडीवर उलटे झोपायला लावा. याशिवाय, तुम्ही त्याला तुमच्या खांद्यावर देखील ठेवू शकता, त्याच्या पाठीवर गोलाकार हात फिरवत राहा.
- बाळाला ग्राईप वॉटर पाणी द्या. उचकीपासून सुटका मिळवण्यासाठी ग्राइप वॉटरचा वापर केला जातो.