(देवरूख / सुरेश सप्रे)
राज्यात अडीच वर्षांपासून असंवैधानिकपणे सत्तेवर आलेल्या महायुती सरकारतर्फे दैदिप्यमान महाराष्ट्राचं खच्चीकरण केले जात आहे, ते जनतेला समजावे यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष आ. खा. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाने ‘हक्क मागतोय महाराष्ट्र’ ही व्यापक मोहीम रत्नागिरी जिल्ह्यात राबवण्यात येणार असल्याची माहीती शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्राला वाचवण्यासाठी हिरावलेला हक्क परत मिळवण्यासाठी एका नव्या जोषाने एकत्र येवून या महायुती सरकारविरोधात गलथान कारभारांची पोलखोल करायची आहे. यासाठी ‘हक्क मागतोय महाराष्ट्र’ ही व्यापक मोहीम जिल्हाभर राबवण्यात येणार आहे.
शेतक-याला हमीभावापासून, पीक विम्यापासून, दुष्काळातील मदतीपासून वंचित ठेवण्याचं काम, सोयाबीन, कांदा, कपाशी, संत्रा उत्पादक चिंतेत, दूध उत्पादक शेतकऱ्यांची गळचेपी, पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलेंडर, वीज, प्रवास खर्च, असुविधा, कायदा सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा, भ्रष्टाचारामुळेच उद्योगाजकांनी महाराष्ट्राकडे पाठ फिरवली असून उद्योग प्रकल्प महाराष्ट्राबाहेर पाठवले ते याच महायुती सरकारने. तसेच स्पर्धा परिक्षांमधील सावळा गोंधळ, रिक्त सरकारी पदं, रखडलेली शिक्षक भरती, नीट परिक्षांमधील भ्रष्टाचार अशा भोंगळ व भ्रष्टाचारी कारभाराला उलथवून टाकून जनतेच्या भल्यासाठी सर्वांनी संघटीतपणे काम करुन गतिमान शासन आणण्यासाठी कटिबद्ध होवूया असे आवाहन ही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने यांनी केले आहे.
उभ्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या मालवणमधील पुतळ्यातही घोटाळा करतानाही यांनी मागे पुढे पाहिलं नाही. महापुरुषांचा अवमान करताना यांना कुठलंच भय बाळगलं नाही. संविधानालाही बदलण्याचा यांचा डाव अद्याप कायम असून समृध्दी महामार्ग, अटल सेतू, कोस्टल रोड ही निकृष्ट काम करून जनतेचा जीव धोक्यात टाकला. सर्वाधिक जीएसटी केंद्राच्या तिजोरीत टाकून, आजूबाजूच्या इतर राज्यांना पोसून महाराष्ट्राला मिळणारा परतावा मात्र अगदी नगण्यच देवून महाराष्ट्राला कर्जाच्या विळख्यात अडकवित महाराष्ट्राचं वैभव ज्या महायुतीने घालवलंय ते पून्हा मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी असे त्यांनी सांगितले.
तसेच राज्यातील जनतेचा आक्रोश दर्शवणारे “हक्क मागतोय महाराष्ट्र” हे गीत प्रसारित करण्यात येणार असून
महायुती सरकारविरोधात गलथान कारभारांची पुस्तिका तयार करण्यात आली आहे..
यातील जंत्री पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता घरोघरी जाऊन याची माहिती देणार असल्याचे ही बने यांनी सांगून या मोहीमेत सहभागी होण्यासाठी 70 30 12 00 12 या क्रमांकावर मिस्ड कॉल दया. त्यानंतर तुम्हाला एक मॅसेज येईल. त्यामधील www.hakkmagtoymaharashtra.com या संकेतस्थळावर क्लीक करून या मोहीमेत सहभागी व्हावे, असे आवाहन ही जिल्हाधक्ष सुरेश बने यांनी शेवटी कले आहे.