( रत्नागिरी )
नुकत्याच राजापूर येथे झालेल्या राज्य निवड चाचणी अर्थात जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत रत्नागिरीच्या एस आर के तायक्वांदो क्लबच्या खेळाडूंनी भरघोस यश मिळवलं. क्लब अंतर्गत या चॅम्पियन्सचा मान्यवरांच्या हस्ते कौतुक सोहळा आणि पदक वितरण करण्यात आलं. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना शहर प्रमुख बिपिन बंदरकर आणि शिवसेना महिला आघाडी प्रमुख शिल्पा सुर्वे हे मान्यवर उपस्थित होते.
22 वी सिनियर महिला व पुरुष ज्युनिअर आणि सबज्युनिअर ७ वी कॅडेट व पिवी मुले व मुली रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद क्युरोगी व पुमसे तायक्वांदो चॅम्पियनशिप 2024-25 रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 5 ते 7 जुलै 2024 या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन राजापूर येथे तायक्वांदो मोठ्या उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत एस आर के तायक्वांदो चे 31 खेळाडू सहभागी झाले होते. यात १४ सुवर्ण १०, रौप्य आणि २ कांस्य पदक क्लबच्या खेळाडूंनी मिळवली. या सर्व यशस्वी खेळाडूंचा कौतुक सोहळा क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. विजेत्या सर्व खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पदक वितरण करण्यात आलं.
पदक विजेते पुढीलप्रमाणे –
सुवर्ण पदक
पार्थ गुरव, स्वरा साखळकर ( फाईट पुमसे ), वेदांत चव्हाण, सार्थक चव्हाण, मृण्मयी वांयगणकर, ओम अपराज (जुनियर सीनियर) अमेय सावंत, वेदांगी हळबे, स्वर्णिका रसाळ, मृदुला पाटील, श्रेयसी हातिसकर, सर्मथा बने.
रौप्य पदक
रोहित कुंदकर, अन्फल नाईक, तुषार कोळेकर, आराध्य सावंत, रावी वारंग, प्रांजल लांजेकर, श्रुती चव्हाण, सान्वी मयेकर, दिव्या साळवी, सई सावंत
कांस्य पदक
आर्वी नार्वेकर, ऋतूजा चित्ते.
यावेळी स्पर्धेतील सहभागी झालेल्या निर्मित सावंत, यज्ञा चव्हाण, आयुष चव्हाण, साईश हळबे यांचही प्रोत्साहनपर कौतुक करण्यात आला. यावेळी एस आर के क्लबला नेहमी मदत करणारे रत्नागिरी शिवसेनेचे शहर प्रमुख बिपिन बंदरकर यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. रत्नागिरी महिला जिल्हा प्रमुख शिल्पा सुर्वे यांनी यावेळी उपस्थित पालकांना उद्बोधक मार्गदर्शन केलं आणि राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या गुणी खेळाडूंना घडवणारे प्रशिक्षक शाहरुख शेख यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी क्लबचे उपाध्यक्ष अमोल सावंत, कोषाध्यक्ष अंजली सावंत सदस्य वीरेश मयेकर, पालक आणि पुष्पदत्त इंग्लिश मिडीयम स्कूलच्या चेअरमन अरुणा साळवी, ग्राफिक डिझाईनर सत्यशील सावंत, शिवाजीनगर विभाग प्रमुख सीमा कदम, क्लबचे अध्यक्ष आणि प्रमुख प्रशिक्षक शाहरुख शेख सर्व पालक वर्ग यांनी विशेष मेहनत घेतली.