(रत्नागिरी)
रत्नागिरीत विविध संघटनांच्या माध्यमातून तालुकास्तरावर डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले जाते. याठिकाणी आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी पाहायला मिळत असते. जयंतीनिमित्त भीम युवा पँथर संघटनेचे पदाधिकारी अनोखा उपक्रम राबवित असतात. येथे दाखल झालेल्या हजारो अनुयायांना भीम युवा पँथर संघटनेकडून मोफत थंडगार कोकम सरबतचे वाटप करण्यात आले.
उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांची तहान भागविण्यासाठी भीम युवा पँथर संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत कोकम सरबतचे वाटप करण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरात योगिता जाधव, मानवी सावंत, राखी पवार, अध्यक्ष रविंद्र पवार, सचिव शशिकांत कांबळे, कोषाध्यक्ष शरद सावंत, तुषार पवार, दिपक जाधव, माजी अध्यक्ष प्रितम आयरे, अमोल जाधव, किशोर पवार, सुजित चवेकर, मंगेश पवार, संतोष सावंत हे कार्यकर्ते स्वतः स्टॉल मांडून प्रत्येकाला कोकम सरबतचे वाटप करत होते. तसेच दाखल झालेल्या अनुयायांना थंडगार पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती.
एसटी कर्मचाऱ्याकडून वडापाव वाटप
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निम्मित दाखल होणाऱ्या अनुयायांना एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने वडापावचे वाटप करण्यात आले. यामध्ये महेश कांबळे यांनी वडापाव वाटप केलं. यावेळी अमोल जाधव, अजय खेडस्कर, अनिल चवेकर, मंगेश गोवळकर आदी उपस्थित होते.