(तरवळ /अमित जाधव)
वंदना फाउंडेशन मुंबई मार्फत रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय आणि मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज मधील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप वंदना फाउंडेशन चे प्रमुख मालगुंड प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री मिलिंद कृष्णा पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
वंदना फाऊंडेशन चे प्रमुख श्री मिलिंद पवार हे मालगुंड प्रशालेचे माजी विद्यार्थी आहेत सध्या ते मुंबई येथे कार्यरत आहेत. आपल्या आईच्या स्मरणार्थ त्यांनी ही शैक्षणिक मदत दिली आहे. आपण ज्या शाळेत शिकलो ज्या शाळेमुळे आपण मोठे झालो याची जाणीव ठेवून, जे विद्यार्थी गरजू आहेत व ज्यांचे वडील हयात नाहीत अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करावी या उदात्त हेतूने त्यांनी ही मदत केली आहे, एकूण २९ विद्यार्थ्यांना त्यांनी ही शैक्षणिक मदत केली.
दरम्यान सदर कार्यक्रमात त्यांनी आपल्या विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा दिला भविष्यात देखिल आपण अशा गरजू विद्यार्थ्यांना फाऊंडेशनच्या माध्यमातून मदत करू असे आवर्जून सांगितले. सदर कार्यक्रमाला मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री विनायक राऊत उपस्थित होते, तसेच वंदना फाउंडेशन चे प्रमुख श्री मिलिंद पवार, तसेच त्यांचे सहकारी श्री शशांक वंजारी, प्रशालेचे पर्यवेक्षक श्री उमेश केळकर, मिलिंद सुर्वे तसेच शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. श्री मिलिंद पवार यांनी केलेल्या मदतीबद्दल बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेजच्या वतीने त्यांना धन्यवाद देण्यात आले. तसेच मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सुद्धा त्यांना धन्यवाद देण्यात आले.