( संगमेश्वर / प्रतिनिधी )
पैसाफंड इंग्लिश स्कूल संगमेश्वर एसएससी 1987 च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनानंतर पुन्हा एकत्र येत सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या हेतूने कृतज्ञता प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवून त्याद्वारे त्यांना शैक्षणिक दृष्ट्या सक्षम बनविणे हा एकमेव उद्देश ठरविण्यात आला आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून दुर्गम भागातील ग्रामीण व खेड्यातील मुलांना शैक्षणिक स्थैर्य प्राप्त व्हावे या हेतूने जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक इयत्ता पहिली ते पाचवी च्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप अंतर्गत 37 स्कूल बॅग चे वितरण केले अंगणवाडी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. हा कार्यक्रम संगमेश्वर नजीकच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा कोडअसुर्डे मध्ये झाला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी शिक्षक सौ शुभांगी रामकृष्ण मुळे व श्री रामकृष्ण गोविंद मुळे यांची होती. या माजी शिक्षकांचा कृतज्ञता प्रतिष्ठान तर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कृतज्ञता प्रतिष्ठानच्या कार्याचा त्यांनी गौरव केला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या दरम्यान कृतज्ञता प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री गणेश सिताराम शिंदे यांनी कृतज्ञता प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली. उपाध्यक्ष श्री सुभाष लक्ष्मण रहाटे यांनी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांची ओळख करून दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दरम्यान श्री सुरेश पडये यांनी प्रतिष्ठानची उद्दिष्टे विशद केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संतोष आंबवकर यांनी केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री गणेश सिताराम शिंदे यांनी अध्यक्ष मार्गदर्शनामध्ये आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थ्यांचा पालकांचा सहभाग महत्त्वाचा असून पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास करणे आवश्यक आहे असे सांगितले. यापुढेही ही चळवळ अधिक प्रभावशाली करण्याचा मानस अध्यक्षांनी व्यक्त केला. श्री संतोष आंबवकर यांनी ग्रामस्थ व शिक्षक वृंदांचे आभार व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमासाठी ज्या ज्या व्यक्तींनी आर्थिक व वस्तुरूपाने मदत केली त्या सर्व शिक्षक व माजी विद्यार्थ्यांचे ऋण व्यक्त केले.या कार्यक्रमास संतोष शांताराम रहाटे श्री दिलीप सोलिंम श्री दिलीप मसुरकर श्री प्रकाश पवार श्री शांताराम गोसावी
श्री चंद्रशेखर नार्वेकर श्री सुभाष गुरव श्री धर्मराज वाडकर श्री प्रकाश भोसले श्री सुभाष गुरव तसेच मुख्याध्यापक सुनील करंडे शालेय समिती अध्यक्ष रश्मी भानुषाली शालेय समिती सदस्य हंसराज शिंदे शिक्षण प्रेमी नागरिक श्री सुरेश मुळे उपस्थित होते.