(संगमेश्वर)
तालुक्यातील उपक्रमशील आदर्श जि. प. शाळा पिरंदवणे नं. १ येथे ‘इको क्लब फॉर मिशन लाईफ’साठी ‘मिशन इको क्लब’ची स्थापना करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष चव्हाण, शिक्षक श्री. कुलदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील ११ विद्यार्थ्यांची निवड या क्लबच्या सदस्यपदी करण्यात आली.
‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन २०२०’ नुसार विद्यार्थ्यांमध्ये काही कौशल्ये आणि पर्यावरणविषयक जनजागृतीबाबत क्षमता विकसित करण्यासाठी या क्लबच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी पाणी, संसाधन संवर्धन, स्वच्छता इ. बाबी विद्यार्थ्यांनी शिकल्या पाहिजेत हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून या क्लबची निर्मिती शासन परिपत्रकाप्रमाणे करण्यात आली आहे.
या क्लबमध्ये आर्यन घेवडे (अध्यक्ष), रिद्धी तळेकर (उपाध्यक्ष), वेदिका गुरव, कुलदीप धोपट, सार्थक आंग्रे, आराध्या गुरव, विघ्नेश घेवडे, वैदेही घेवडे, स्वस्तिक धोपट, महेश्वरी घेवडे, सम्यक गमरे हे विद्यार्थी काम करणार असून श्री. कुलदीप देशमुख हे प्रभारी म्हणून जबाबदारी पहाणार आहेत.