(संगमेश्वर)
पावसाळ्यात ओढावणाऱ्या आपत्तीच्या काळात उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने संगमेश्वर तालुक्याचा आपत्ती आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार ३५ गावे संभाव्य पूरग्रस्त असून, २८ गावे दरडप्रवण म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
तालुक्यात नदीकिनारी असणारी ११ गावे, खाडीकिनारी असणारी १० गावे आणि धरणाच्या क्षेत्रात असणारी १४ गावे अशी ३५ गावे संभाव्य पूरग्रस्त गावे निश्चित करण्यात आली आहेत. याठिकाणी पुराची स्थिती निर्माण झाल्यास तेथील ग्रामस्थांना जवळच्या शाळा, समाजमंदिर याठिकाणी तात्पुरते स्थलांतरित करण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच पोहणाऱ्या नागरिकांची यादी तयार करण्यात आली आहे. तसेच ७ लाइफ जॅकेट, १२ लाइफ बोया, रोप, टॉर्च आणि पब्लिक अँड्रेसिंग सिस्टीम, ऑनलाइन सूचना करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पूरग्रस्त गावांप्रमाणे २८ गावे दरडप्रवण गावे आहेत. सुमारे ३००० लोकांना याचा धोका उदभवू शकणार असल्याचा संभव आहे. ज्या गावांना पुराचा अधिक धोका आहे. तेथील ग्रामस्थांना स्थलांतराच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. तसेच खाडी किनारी असणाऱ्या गावांनाही सतर्कतेच्या आणि स्थलांतराच्या नोटीस देण्यात आली आहे. याबरोबरच आपत्ती कक्ष २४ तास तैनात ठेवण्यात येणार आहे. कुठेही झाड मार्गावर पडले तर ते हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सज्ज आहे. त्याचबरोबर मदत कार्यासाठी हेल्प अकॅडमीही सज्ज राहणार आहे.
संभाव्य पूरग्रस्त गावे
नावडी, लोवले, कुरधुंडा, वांदी, आंबेड बुटूक, कोळंबे, कसबा, माखजन, कोंडगाव, ओझरे बुद्रूक, कासे, असावे, कळंबुशी, सरंद, करजुवे, मुरडव, आरवली, बुरंबाड, कोंडिवरे, कुंभारखाणी बुद्रूक, कुचांबे, कुटगिरी, राजीवली.
दरडप्रवण गावे
ओझरे बुटूक, निनावे, निवधे, बामणोली, कसबा, अंगवली, मुर्शी, दख्खिन, कोळंबे, नायरी, अणदेरी, तळे, शृंगारपूर, तिवरे घेरा प्रचितगड, पुर्ये तर्फ देवळे, कुळ्ये, देवळे, कातुर्डी कोंड, मलदेवाडी, वांद्री, कांटे, कोंढूण आणि किरडवे.
खाडी किनाऱ्यावर पूरग्रस्त गावे
फुणगूस, करजुवे, माखजन, कासे, कोंड्ये, पोचरी, देण, डावखोल, डिंगणी, डिंगणी कुरण.