(गणपतीपुळे / वैभव पवार)
त्रिरत्न बौद्ध महासंघ रत्नागिरी यांचेवतीने गुरुवार दिनांक 31 ऑक्टोबर ते रविवार दिनांक 3 नोव्हेंबर या कालावधीत निवासी धम्मशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे नेतृत्व धम्मचारी यशोरत्न ( पुणे )हे करणार आहेत. तर त्यांच्यासमवेत धम्मचारी श्वेतकेतू (पोचरी), धम्मचारी सत्यरत्न (फणसवळे), धम्मचारी सत्यसागर (पानवळ), धम्मचारी सुनंदक (करबुडे), धम्मचारी शीलनंदक (आंबेशेत) आदी धम्मचाऱ्यांचा सहभाग असणार आहे. या धम्म शिबिरांमध्ये पूज्य भंते उर्गेन संघरक्षित यांच्या पाच मुख्य शिकवणी असा विषय ठेवण्यात आला आहे.
सदर शिबिर रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी साळवी स्टॉप रत्नागिरी येथे होणार असून 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून ते रविवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेपर्यंत हे शिबिर चालणार आहे . या शिबिरात शिबिरार्थी बंधू भगिनींसाठी दानमूल्य 250 आकारण्यात येणार आहे. तरी येताना बिछाना, ताटवाटी व लेखन साहित्य आणावे. तसेच शिबिर पूर्णतः निवासी राहील. 14 वर्षांवरील सर्व विद्यार्थ्यांनी व विद्यार्थी यांना शिबिरात प्रवेश विनामूल्य आहे, असे कळविण्यात आले आहे.
या शिबिराच्या अधिक माहितीसाठी त्रिरत्न बौद्ध महासंघ रत्नागिरीचे धम्ममित्र सुनंदक 98 60 62 57 66, रविकांत पवार 94 21 22 9336, चंद्रलेखा पवार 94 20 95 38 74, अनामिका जाधव 98 22 48 6329 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. या धम्म शिबिरात ध्यानसाधना, संपर्क सराव, स्वावलंबन धम्मअभ्यास आदी गोष्टी प्रत्यक्ष शिकवल्या जातात. गतवर्षी त्रिरत्न बौद्ध महासंघ रत्नागिरीच्यावतीने या धम्म शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिरामध्ये अनेक विधायक गोष्टींची माहिती शिबिरार्थीना होते. त्यामुळे हे शिबिर महत्वपूर्ण मानले जाते. तसेच याच शिबिरातून त्रिरत्न बौद्ध महासंघा च्या वतीने खऱ्या अर्थाने धम्मजागृती करण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून यंदाही धम्म शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अधिकाधिक धम्म बंधू-भगिनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.