(देवरूख / सुरेश सप्रे)
देवरूख शहरातील मराठी शाळा नं. १ जवळच नदीवरील वरची आळीकडे जाणे-येणे साठीचा मुख्य रहदारी असलेला जुना छोटा पुल गतवर्षीच्या पावसात एका बाजून खचल्याने रहदारी करणे धोकादायक झाले होते. तो पुल तातडीने प्राधान्यक्रमाने दुरूस्त करणेस न.प प्रशासनाने दुर्लक्षच केल्याने आता भर पावसाळ्यात संभाव्य धोका व आपल्यावर येणारे बालंट लक्षात घेऊन दुरूस्ती काम हाती घेण्यात येणार आहे.
देवरूख वरची आळी, भायजे वाडी, कुभांर वाडी, मोरे वाडी, शिंदे वाडी, गेल्या वाडी, वाडेश्वर स्मशान भुमी व हरपुडे याकडे जाणे येणे साठी पुर्वी शिवकालीन दगडी पुल होता. त्या दगडी पुलावरून वाहन रहदारी करणे अवघड होत असलेने त्या शिवकालीन पुलाच्या लागूनच वार्ड ४ मधील प्राथमिक मराठी नं१ शाळेच्या जवळच असलेला हा छोटा पुल १९७६ सुमारास बांधणे आला होता. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी वर्गाची व वाहनांची वाहतूक व्यवस्था सक्षम झाली होती. असा हा मुख्य रहदारी वर्दळ असलेला पूलाचा एक भाग खचत गतवर्षीच्या पावसात त्याला भगदाड पडले. त्यावर प्रशासनाने त्वरीत दुरूस्ती न केल्याने व पाणी साठा असलेने ते भगदाड मोठे होत असल्याने न. प. ने त्यावरील वाहतूक बंद केली व तसा फलकही लावला. पण तो तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असताना ही प्रशासनाने दुर्लक्ष केले .
या दुरूस्तीसाठी अंदाजे १५ लाख रू. खर्च अपेक्षित धरुन त्यादुरूस्तीसाठी महाराष्ट्र सुर्वण जयंती नगरोत्थान जिल्हा विकास निधीतून वा अन्य निधीतून तातडीने दुरूस्ती करून शाळकरी मुले व जनतेच्या रहदारीला होणारा संभाव्य धोका टाळणेसाठी नगर पंचायतीने तातडीने उपाय योजना करावी अशी मागणी तात्कालिन नगरसेवक वैभव पवार यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाव्दारे केली होती. तसेच या विषय गतवर्षी मासिक सभेत उपस्थित करून आवाज उठवून सभागृहाचे लक्ष वेधले होते.
तरीही या धोकादायक पुल तातडीने दुरूस्तीसाठी वर्षभरात निधीसाठी प्रशासनाने लक्ष दीले नाही. १०लाखाच्या बक्षीस मिळालेल्या रक्कमेतुन इतरत्र खर्च टाकला मग पुल दुरूस्तीसाठी का नाही परवानगी घेतली? असा सवाल ही उपस्थित केला जात आहे. आता भर पावसाळ्यात भगदाड मोठे होत असल्याने दुर्घटना घडणेची शक्यता लक्षात आल्यावर ते भगदाड क्रॉकीट टाकून बुजविण्यात येणार असल्याचे न. प कडून सांगितले जात आहे. शहरातील गटार व्यवस्थेसह अनधिकृत बांधकामांना प्राधान्य देण्यारे नगर पंचायत प्रशासन अचानक जागे झाल्याने नक्की काय उपाय योजना करते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे..