(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर पोलीस ठाण्याचा नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस उपअधीक्षक (डी. वाय. एस. पी ) शिवप्रसाद पारवे यांचे विविध क्षेत्रातील लोकांनी पोलीस ठाण्यात जाऊन सदिच्छा भेट घेऊन शाल व पुष्पगुछ देऊन स्वागत केले
पोलीस निरीक्षक पदी काही महिन्यापूर्वी संगमेश्वर पोलीस ठाण्यात रुजू झालेले अमित यादव यांची रत्नागिरी येथे आर्थिक गुन्हा शाखेत बदली झाली असून त्यांच्या जागी पोलीस.उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी काही दिवसांपूर्वी येथील पोलीस ठाण्याचा कार्यभार हाती घेतला आहे.
या पूर्वी स्मिता सुतार ह्या संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारणाऱ्या पहिल्या महिला पोलीस निरीक्षक ठरल्या होत्या. तर नुकतेच रुजू झालेले शिवप्रसाद पारवे हे पोलीस उपधिक्षक म्हणुन येथील पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारणारे पहिले मानकरी ठरले आहेत. आज पर्यंत पोलीस निरीक्षक यांच्या व्यवस्थापनाखाली येथील पोलीस ठाण्याचा चालणारा कारभार यापुढे पोलीस उपधिक्षक यांच्या व्यवस्थापनाखाली चालणार आहे.
संगमेश्वर पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारणारे नवनिर्वाचित पोलीस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे यांची सामाजिक, राजकीय तसेच सर्वसामान्यांपासून अनेकजण सदिच्छा भेट घेत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत असून. नुकतेच प्रसिद्ध उद्योजक सतीश चाळके, बुरंबी येथील प्रसिद्ध व्यवसायिक नरेशशेठ जागुष्टे, ठेकेदार राकेश चव्हाण, भाजप चे तालुका पदाधिकारी मिथुन निकम, शिंदे गट शिवसेना पदाधिकारी सुधीर चाळके, पत्रकार एजाज पटेल यांनी सुद्धा पोलीस अधीक्षक शिवप्रसाद पारवे यांची पोलीस ठाण्यात जाऊन सदिच्छा भेट घेत त्यांचे शाल व बुके देऊन स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.