(संगमेश्वर / एजाज पटेल)
सावर्डे येथे अवघ्या काही दिवसांपूर्वी दहशतवाद विरोधी पथकाकडून कारवाई झालेल्या संशयित आरोपी पाटणकर नामक याचे संगमेश्वर परिसरात मुबंई -गोवा राष्ट्रीय महामार्गालगत चायनीज सेंटर असून संशयित च्या मालकीचे असलेले चायनीज सेंटर संबंधित केसचा निकाल लागेपर्यंत बंद करण्यात यावे याबाबतचे निवेदन संगमेश्वर व्यापारी संघ आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान च्या वतीने संगमेश्वर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
संगमेश्वर व्यापारी संघ आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ठपणे नमूद करण्यात आले आहे की, सावर्डे येथील पाटणकर नामक याचे मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गालगत संगमेश्वर येथे नामांकित चायनीज सेंटर आहे. परंतु या व्यक्तीवर दहशतवाद विरोधी पथकाने जी कारवाई केली आहे, याअर्थी सदर व्यक्ती व्यवसायातून मिळवलेला पैसा हा देश विरोधी कारवाई करता करीत आहे. त्यामुळे या व्यक्तीचा संगमेश्वर येथील चायनीज चा व्यवसाय सदर केसचा निकाल लागेपर्यंत बंद ठेवावा व सदर व्यक्ती दोषी आढळल्यास सदर व्यवसाय कायमचा बंद करावा असे निवेदन संगमेश्वर व्यापारी संघ तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संगमेश्वर विभाग पदाधिकारी यांचेकडून देण्यात आले आहे.