(दापोली)
घरालगतचा पालापाचोळा जाळणाऱ्या वृद्धाचा त्यात होरपळून मृत्यू झाला आहे. तालुक्यातील भोपण साहिल वाडा येथील रविवारी, सायंकाळी ४:३० वाजता हा प्रकार घडला. निजामुद्दीन बाला पावणे (८५) असे त्यांचे नाव आहे.
निजामुद्दीन पावणे हे आपल्या घराशेजारी असलेला पालापाचोळा जाळत होते. त्यांच्या पुढ्यात असलेल्या पालापाचोळ्याने अचानक पेट घेतल्याने ते आग विझविण्यासाठी गेले. त्यात तोल जाऊन पडल्यामुळे ते होरपळले.
Also Read :खाडीत बुडून विवाहितेचा मृत्यू
ही बाब लक्षात येताच, आसपासच्या लोकांनी धावाधाव करुन त्यांना लगेचच दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. या घटनेची नोंद दापोली पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1