(रत्नागिरी)
तालुक्यातील गोळप येथे उंदीर मारण्याचे औषध प्राशन केलेल्या तरुणाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोमवारी मध्यरात्री १.४० वा. घडली. सुरेश प्रकाश डोंगरे (३३, रा. गोळप डोंगरेवाडी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सोमवार १२ ऑगस्ट रोजी सकाळी सुरेशने अज्ञात कारणातून राहत्या घरी उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले होते. त्यानंतर त्याला उलट्या होउन छातीत जळजळ होऊ लागल्याने त्याचा चुलत भाऊ सुनील गोपाळ डोंगरे याने त्याला उपचारासाठी सकाळी १० वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना मध्यरात्री १.४० वाजण्याच्या सुमारास सुरेशचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.