(रत्नागिरी)
शहरातील मिरकरवाडा येथे जाळे विणण्याच्या कंपनीतील परराज्यातील कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ६) रात्री १०:५५ वाजण्याच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. बेहरा पुरुषोत्तम दामोदरम (५८, मूळ रा. श्रीकाकुलम, आंध्र प्रदेश, सध्या रा. रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे.
कंपनी मालक ताजुद्दीन होडेकर (५५, रा. खडक मोहल्ला, मिरकर वाडा, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस स्थानकात खबर दिली. त्यांच्या कंपनीत दामोदरम कामाला होता. मंगळवारी सायंकाळी त्याच्या पोटात दुखू लागल्याने ते त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले. तेथून परतल्यावर तब्येत बिघडल्याने तो लवकर झोपला. तो जेवणासाठी न उठल्याने होडेकर यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत तो मृत झाला होता.