(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी यांचा ५६वा वाढदिवस साजरा करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, सहकारी पोलीस, मित्रपरिवार आणि पत्रकार एकत्र आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर विशेष आनंद दिसून येत होता. विवेक साळवी यांच्या निवासस्थानी वाढदिवस सोहळा पार पडला. आपल्या कठोर परिश्रमासाठी ओळखले जाणारे विवेक साळवी यांनी वेळोवेळी निर्भीड व निष्पक्षपणे जनतेची सेवा केली आहे.
पोलीस दलातील सहकारी, स्थानिक रहिवासी, मित्र परिवार आणि प्रसारमाध्यमांचे सदस्य यांनी विवेक साळवी यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि वाढदिवसाच्या विशेष दिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठया प्रमाणात एकत्र आले होते. वाढदिवसीय कार्यक्रमात सर्वांनी पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी यांच्या अनुकरणीय सेवेचे कौतुक करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पी.एस.आय विवेक साळवी हे संगमेश्वर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रानंतर्गत येणाऱ्या माखजन पोलीस दूरक्षेत्रात आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत.
पोलीस ही अशी व्यक्ती आहे, जी दिवसरात्र जनतेच्या सेवेसाठी तत्पर असते. अश्या वेळी वाढदिवस असु दे किंवा अन्य कोणताही सोहळा असु दे, पोलिस आपल्या कुटुंबासोबत न राहता सदैव आपले कर्तव्य बजावत असतो. दरम्यान कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांनी विवेक साळवी यांचे स्थानिक प्रसारमाध्यमांसोबतचे सलोख्याचे संबंध ठळकपणे मांडले आणि जनतेशी संवादाचे खुले माध्यम आणि पारदर्शकता राखण्यात त्यांचा सक्रिय दृष्टिकोन उपस्थितांसमोर मांडला.
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारताना विवेक साळवी यांनी म्हटले, आजच्या दिवशी माझी माणसे माझ्यासाठी एकत्र आलेली पाहून मला खूप आनंद होत आहे. माझे आजी-माजी सहकारी आणि समुदायाकडून मिळालेला पाठिंबा आणि प्रोत्साहनाबद्दल मला काम करण्याची स्फूर्ती आणि उत्साह येतो. आपणा सर्वांचा मी मनापासून कृतज्ञ आहे, या पुढेही असेच आशीर्वाद आणि प्रेम सदैव असूदेत असे भावनिक उद्गार त्यांनी यावेळी काढले.