(साखरपा / दीपक कांबळे)
रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील दाभोळे घाटात दरड कोसळल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झालेली आहे. दरम्यान कोणतीही दुर्घटना घडली नाही.
महामार्गावरील रस्ता रुंदीकरणाच्या कामातील यंत्रसामग्रीने दरड बाजूला करण्यात आली. यावेळी महामार्गावर चिखल मिश्रित पाणी जोरदार वात असल्याने कामात व्यत्य येत होता. दुपारी 4:15 च्या दरम्यान दरड कोसळल्याने वाहतुकीची कोंडी दोन्ही बाजूने झाली होती मात्र प्रसंगावधान जाणून महामार्गावरील कामगाराने तात्काळ जेसीबीच्या साह्याने दरड बाजूला करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूला सुमारे एक किलोमीटरवर वाहतूक थांबली होती.त्यानंतर सुमारे तासभरानंतर वाहतूक सुरळीत चालू झाली. यावेळी दाभोळे महामार्ग मृत्युंजय दूध ग्रुपचे प्रतिनिधी दीपक कांबळे, काका हिरवे आणि रविंद्र सुकम याने तात्काळ घटनास्थळी जाऊन वाहतुकीचे नियमन केले.