( रत्नागिरी /प्रतिनिधी )
दि.बुध्दिस्ट सोसायटी ऑफ् इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रत्नागिरी व तालुका शाखा दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाई राष्ट्रीय स्मारक वणंद दापोली येथे रविवार दि.२७.१०.२०२४ ते मंगळवार दि.०५.११.२०२४ पर्यंत बौद्धाचार्य, श्रामणेर शिबीर आयु.विजय जाधव जिल्हा उपाध्यक्ष संस्कार विभाग यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात ४० प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग नोंदविला आहे.
भिक्षू संघाचे संघनायक पुज्य भन्ते बोधी रत्न यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर संपन्न होणार आहे. या शिबीराचे उद्घाटन अनंत सावंत (जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरी) यांच्या हस्ते होणार असून एन.बी.कदम (जिल्हा महासचिव) प्रदिप जाधव (जिल्हा कोषाध्यक्ष) प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच या शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून अनंत सावंत (वरिष्ठ केंद्रीय शिक्षक), एन.बी.कदम ( केंद्रीय शिक्षक), विजय जाधव (केंद्रीय शिक्षक), विकास पवार ( केंद्रीय शिक्षक), अल्पेश सकपाळ (केंद्रीय शिक्षक), संजय कांबळे (केंद्रीय शिक्षक) यांचे देखील मार्गदर्शन लाभणार आहे.
या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती जिल्हा पदाधिकारी विजय कांबळे, जनार्दन मोहिते, शरणपाल कदम, सुनिल पवार, सुनिल धोत्रे, संदिप धोत्रे, महेंद्र कदम, तानाजी कांबळे, तालुका पदाधिकारी अनिल घाडगे (अध्यक्ष दापोली), राहूल मोहिते (अध्यक्ष संगमेश्वर) विजय मोहिते (अध्यक्ष रत्नागिरी), आर.बी.कांबळे (अध्यक्ष लांजा), सत्यवान जाधव (अध्यक्ष राजापूर), जयरत्न कदम (अध्यक्ष चिपळूण), विद्याधर कदम (अध्यक्ष गुहागर), अ.के मोरे (अध्यक्ष खेड), हर्षद जाधव (अध्यक्ष मंडणगड) दिपक धोत्रे, अध्यक्ष वणंद ग्राम शाखा आदी उपस्थित राहणार आहेत.