(देवरुख)
दिनांक ३/८/२४ रोजी रत्नागिरी येथे संपन्न झालेल्या ५७व्या आंतर महाविदयालयीन युवा महो्सवात फाईन आर्ट मधिल ७ कलाप्रकरात डी कॅड च्या विद्यार्थ्यांनी ४ सुवर्ण, २ रौप्य व १ उत्तेजनार्थ अशी पारितोषिके मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. ऑन दी स्पॉट पेंटिंग व पोस्टर मेकिंग मध्ये प्रियांशू मीठागरी प्रथम क्रमांक, कार्टूनिंग मध्ये प्रतिक अक्कतंगेरहाळ द्वितीय क्रमांक, रांगोळी व कोलाज मध्ये साई सनगरे प्रथम क्रमांक, क्ले मॉडेलिंग मध्ये प्रज्वल सनगरे द्वितीय क्रमांक, मेहेंदी मध्ये मानसी कुबडे उत्तेजनार्थ अशी बक्षिसे मिळाली आहेत.
डी कॅड हे रत्नागिरी जिल्ह्यातील चित्रकलेतील पदवी देणारे एकमेव कला महाविद्यालय आहे. येथे मुंबई विद्यापीठ अंतर्गत ४ वर्षाचा पूर्णवेळ अभ्यासक्रम शिकवला जातो. या सर्व विद्यार्थ्यांना कला महाविद्यालयाचे प्राध्यापक अवधूत पोटफोडे यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष अजय पित्रे, ट्रस्टी भारती पित्रे, सेक्रेटरी वीरकर, कला महाविद्यालयाचे प्राचार्य मराठे, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.