( संगमेश्वर/ प्रतिनिधी )
नवरात्रनिमित्त देवी मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शेवटचा हात मूर्तीवरून फिरवला जात आहे. परचुरी येथील कारखान्यात देवी मूर्तीस अधिक मागणी असल्याचे कारागिरांकडून सांगण्यात आले.
अवघ्या एका दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेवला आहे. उत्सवाचे आयोजन करणाऱ्या सार्वजनिक मंडळाकडून तयारीस वेग आला आहे. अनेक मंडळाकडून देवी मूर्ती स्थापना केली जात असते. त्यानिमित्त देवी मूर्ती तयार करण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. परचुरी येथील प्रसिद्ध मूर्तिकार गुरुकृपा आईचे मालक प्रदीप विश्राम चंदरकर यांनी शाडू मातीपासून मुर्त्या साकारल्या आहे. प्रदीप चंदरकर यांच्यासोबत त्यांचा मुलगा नवोदित कलाकार राजन चंदरकर याचा ही हातभार लागत आहे. राजनच्या कलाकसुरीने गेली पाच वर्षे वडिलांच्या मातीकाम व रंगकामामध्ये मोठे सहकार्य लाभत आहे.या कारखान्यात अडीच फूट व दोन फूट अशा दोन मुर्त्या साकारल्या आहेत.
बहुतांशी मूर्ती तयार झाली असून उर्वरित मूर्त्यांवर कारागिरांकडून शेवटचा हात फिरवला जात आहे. आकर्षक अशा दीड ते दहा फुटापर्यंत मुर्त्या साकारण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.