(रत्नागिरी)
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अंतर्गत येणाऱ्या कोकणनगर पोलीस चौकीमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नव्याने रुजू झालेले रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश शिवरकर यांनी कोकणनगर पोलीस चौकी बीट अंतर्गत प्रतिष्ठित नागरिकांची बुधवारी (दि. ३१/१०/२०२४) समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शनपर सूचना केल्या.
आचारसंहिता कालावधी सुरू आहे. मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा सूव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस निरीक्षक शिवरकर यांनी या भागातील नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच पोलीस खात्यात मार्फत ही योग्य ती खबरदारी घेण्यात येईल असे ही आश्वासन दिले.
पोलीस निरीक्षक शिवरकर हे नव्याने पोलीस निरीक्षक म्हणून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात रुजू झाले असल्याने स्थानिकांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नौसीन काझी, भूषण सावंत, वैभव पाटील, हर्षराज पाटील, रोशन पालकर, इंलीयाज खोपेकर, मन्सूर नावडे, खान, कोकण नगर बीट अंतर्गत येणारे सर्व पोलीस पाटील, चौकीतील पोलीस अधिकारी, तसेच असंख्य स्थानिक नागरिक उपस्थित होते.