(राजापूर / वार्ताहर)
राजापूर-लांजा-साखरपा हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काँग्रेसला एकही जागा न मिळाल्याने राजापूर-लांजा-साखरपा, मतदारसंघांमध्ये काँग्रेसने दावा केला असून भविष्यात हा मतदार संघ काँग्रेसला मिळावा असा एकमुखी ठराव आज राजापूर येथे झालेल्या सभेत करण्यात आला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राजापूर तालुका काँग्रेस कार्यकर्त्यांची तात्काळ सभा राजापूर तालुक्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
यावेळी राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा असा एकमुखी ठराव या सभेत करण्यात आला.
भविष्यात काँग्रेसचाच उमेदवार या मतदार संघात निवडून येणार असा विश्वासही यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला. यावेळी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी मित्रपक्षावर तसेच महाविकास आघाडीवर नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे दिसून आले.
या सभेला माजी आम.हुस्नबानू खलिफे यांचेसह राजापूर तालुका अध्यक्ष किशोरभाई नारकर, माजी नगराध्यक्ष कोळेकर, मा.नगराधक्ष जमीरभाई खलिफे, माजी तालुकाधक्ष बंड्या बाकाळकर, लियाकतशेठ काजी, शरद (भाई) साखळकर, अनामिका जाधव, महिला अध्यक्ष सावित्री कनेरी, दाजी चव्हाण, अल्पसंख्याक विभागीय अध्यक्ष महंमदअली वाघू, राजापूर सेल चे अध्यक्ष संतोष कुळये, मा. पंचायत समिती सदस्य बाझी विश्वासराव, युवा नेते मंदार सप्रे, जितू खामकर विनायक सक्रे व मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती