(नवी दिल्ली)
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आज आपला जाहीरनामा जाहीर प्रसिद्ध केला आहे. बेरोजगारी ही देशातील सर्वात मोठी समस्या असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. त्यानुसार या जाहीरनाम्यात पक्षाकडून ५ न्याय आणि २५ हमींचं आश्वासन देण्यात आलंय. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी या घोषणापत्राला ‘न्याय पत्र’ नाव दिलय. आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात काँग्रेसने अनेक आश्वासन दिली आहेत. युवा, महिला, शेतकरी आणि कामगारांना गॅरेंटी दिली आहे.
यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी शुक्रवारी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधीसह पक्षाचे ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात मुख्य पाच ‘न्याय’ आणि 25 हमींचा समावेश केलाय.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांमध्ये केंद्र सरकारमध्ये 30 लाख नोकऱ्या, गरीब कुटुंबातील महिलांना वार्षिक 1 लाख रुपये, जात जनगणना, एमएसपीला कायदेशीर दर्जा, मनरेगा मजुरी 400 रुपये, चौकशीचा गैरवापर थांबवणे आदींचा समावेश आहे. एजन्सी आणि पीएमएलए कायद्यात बदल जाहीर केले आहेत. सच्चर समितीच्या शिफारशी लागू करण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या मते, त्यांचा जाहीरनामा पक्षाच्या पाच तत्त्वांवर आधारित आहे ‘सहभागी न्याय’, ‘किसान न्याय’, ‘महिला न्याय’, ‘कामगार न्याय’ आणि ‘युवा न्याय’ अंतर्गत आहे. पक्षाने ज्या पाच हमींची चर्चा केली त्यात 30 लाख सरकारी नोकऱ्या आणि तरुणांना एक वर्षासाठी प्रशिक्षणार्थी कार्यक्रमांतर्गत 1 लाख रुपये देण्याच्या आश्वासनांचा समावेश आहे. काँग्रेसने ‘सामायिक न्याय’ अंतर्गत जातीय जनगणना करण्याची आणि आरक्षणाची 50 टक्के मर्यादा रद्द करण्याची ‘हमी’ दिली आहे. ‘किसान न्याय’ अंतर्गत, पक्षाने किमान आधारभूत किंमत (MSP), कर्जमाफी आयोगाची स्थापना आणि GST-मुक्त शेतीला कायदेशीर दर्जा देण्याचे आश्वासन दिलंय. ‘लेबर जस्टिस’ अंतर्गत काँग्रेसने कामगारांना आरोग्याचा हक्क, किमान वेतन 400 रुपये प्रतिदिन आणि शहरी रोजगार हमी देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच ‘नारी न्याय’ अंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना ‘महालक्ष्मी’ हमीअंतर्गत वर्षाला एक लाख रुपये देण्यासह अनेक आश्वासने आहेत.
महिला न्याय
गरीब कुटुंबातून महिलेला वर्षाला 1 लाख रुपये.
केंद्र सरकारच्या नव्या नोकऱ्यांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण.
आशा, मिड डे मिल, आंगनवाड़ी वर्कर्सना जास्त वेतन देणार.
प्रत्येक पंचायतीमध्ये एक अधिकार सहेली.
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी डबल हॉस्टेल.
किसान न्याय
स्वामीनाथन फॉर्म्युल्यासह MSP कायद्याची गॅरेंटी.
कर्ज माफी प्लान लागू करण्यासाठी आयोग
पीक नुकसान झाल्यास 30 दिवसांच्या आत पैसा ट्रान्सफर होणार.
शेतकऱ्यांसाठी नवीन आयात-निर्यात धोरण.
शेतकऱ्यांसाठी आवश्यक प्रत्येक गोष्टीवरुन GST हटवणार.
कामगार न्याय
दैनिक मजुरी 400 रुपये, मनरेगा मध्येही होणार लागू.
25 लाखाच हेल्थ कवर, मोफत उपचार,
शहरांसाठी सुद्धा मनरेगासारखी नवी पॉलिसी
असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी जीवन आणि दुर्घटना वीमा योजना.
मुख्य सरकारी कार्यालयात कॉन्ट्रॅक्ट मजुरी बंद
सहभागी न्याय
संविधानिक संशोधन करुन 50 टक्क्यांची सीमा संपवणार.
SC/ST/OBC ना पूर्ण हक्क देणार.
SC/ST ची जितकी जनसंख्या तितक बजेट
जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापूर्वी काँग्रेसने घरोघरी हमीभाव अभियान सुरू केले होते. या मोहिमेअंतर्गत, काँग्रेस कार्यकर्ते पुढील काही आठवडे भारतभरातील 8 कोटी कुटुंबांना 14 वेगवेगळ्या भाषांमध्ये छापलेली ही हमीपत्रे वितरित करतील. प्रत्येक हमी कार्डमध्ये, मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी घोषित केलेल्या 5 न्याय आणि 25 हमींची माहिती दिली.