(चिपळूण)
लोकसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याविरोधात आमदार संजय गायकवाड व ताविंदर सिंग मारवाह यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी चिपळूण तालुका काँग्रेसच्या वतीने उपविभागीय पोलिस आधिकारी राजेंद्रकुमार राजमाने व पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
काँग्रेतर्फे दिलेल्या निवेदनानुसार, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात पंजाबचे विरोधी पक्षनेते ताविंदर सिंग मारवाह यांनी प्रसारमाध्यमांसमोर वादग्रस्त वक्तव्य केले. राहुल गांधी यांना ठार मारण्याची धमकी देखील दिली, त्याचबरोबर शिवसेनेचे आ. संजय गायकवाड यांनीही राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला ११ लाखाचे बक्षीस देण्याची जाहीर घोषणा केली. या दोन्ही लोकप्रतिनिधींनी कायद्याचे उल्लंघन करून हिंसक वक्तव्य केले आहे. त्यामुळे या दोघांवरही त्वरित कारवाई करून अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष टी. डी. पवार, सेवा दल तालुकाध्यक्ष इम्तियाज कडू, ओबीसी महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय जाधव, युवक जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह,प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग, संदीप लवेकर, दीपक निवाते, सुरेश पात्रे, दादा आखाडे, अशोक भुस्कुटे, लियाकत शेख, शिवाजी पवार, महिला जिल्हाध्यक्षा विभावरी जाधव, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, शहराध्यक्षा विणा जावकर, माजी नगरसेवका सफा गोठे आदी उपस्थित होते.