(नवी दिल्ली)
कॉंग्रेसकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी गुरूवारी रात्री जाहीर करण्यात आली. 7 राज्यातील 57 उमेदवारांची घोषणा झाली असून यामध्ये महाराष्ट्रातील 7 उमेदवारांची नावे आहेत. यात प्रामुख्याने कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून शाहू महाराज छत्रपती, सोलापूरमधून आमदार प्रणिती शिंदे, पुण्यातून आमदार रवींद्र धंगेकर, नंदुरबारमधून अॅड. गोवाल पाडवी, लातूरमधून डॉ. शिवाजी कालगे, नांदेडमधून वसंत चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मतदारसंघ अन् उमेदवाराचे नाव
- सोलापूर – प्रणिती शिंदे
- कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती
- पुणे – रवींद्र धंगेकर
- नंदुरबार – गोवाल पाडवी
- अमरावती – वळवंत वानखेडे
- लातूर – डॉ. शिवाजी कलगे
- नांदेड – वसंतराव चव्हाण
काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोल्हापूरहून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेसकडून महाराष्ट्रातील एकूण 7 उमेदवारांची नावे काल रात्री जाहीर करण्यात आली असून उर्वरित उमेदवारांची घोषणा देखील लवकरच होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर आणि अमरावती या जागांवर शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसने आधीपासून दावा केला होता. अमरावतीतून शिवसेनेकडून आनंदराव अडसूळ यांना तिकीट दिलं होतं. पण अपक्ष उमेदवार नवनीत राणांनी त्यांना पराभूत केलं होतं. तर दुसरीकडे आनंदराव अडसूळ हे सध्या शिंदे गटात आहेत. पण तरीही ठाकरेंनी अमरावतीवर दावा सांगितला होता. पण आता, काँग्रेसने अमरावतीमधून थेट बळवंत वानखेडे यांचं नाव जाहीर केल्याने ठाकरेंनी ती जागा सोडल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच कोल्हापूरच्या जागेवर देखील शिवसेनेचा दावा होता. पण या यादीत काँग्रेसने शाहू महाराजांना उमेदवारी देऊ केली आहे. त्यामुळे या दोन्ही जागा ठाकरेंना सोडव्या लागल्या आहेत.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1