(चिपळूण)
महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या राज्य शैक्षणिक संशोधन परिषद व भारत सरकार यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शैक्षिणक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनी कॉलेज खेर्डी चिंचघरी सती विद्यालयाच्या 9 शिक्षकांनी तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर घवघवीत यश संपादन केले. या सर्व शिक्षकांचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी (DIET) प्राचार्य श्री.सुशील शिवलकर यांनी अभिनंदन केले. या स्पर्धेत विद्यालयाचे तंत्रस्नेही शिक्षक श्री.योगेश चंद्रकांत नाचणकर यांनी राज्यस्तरावर व्दितीय क्रमांक प्राप्त केला.
तसेच जिल्हास्तरावर श्री.योगेश चंद्रकांत नाचणकर, कु.शर्मिला शिवराम म्हादे यांनी प्रथम, श्री.तुकाराम शिवाजी पाटील, श्री.शैलेश शांताराम कुळ्ये यांनी द्वितीय, श्री.राजेश धाकटू भुवड तृतीय क्रमांक प्राप्त केला. तर तालुकास्तरावर श्री. दत्तात्रय गणपती शिंदे, सौ श्वेता संजय चव्हाण यांनी प्रथम, श्री.शिवाजी आबा पाटील, सौ.रुपालीअपूर्व भुवड, श्री मिलिंद गजानन यादव यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या सर्व शिक्षकांचे डायट चे प्राचार्य श्री.सुशील शिवलकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी प्राचार्य श्री.सुशील शिवलकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी अधिव्याख्याते, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर, सर्व शिक्षक उपस्थित होते.