( पुणे )
महाविद्यालयातील तरुणीबरोबर ओळख वाढवून आपल्या आईशी भेट करुन देतो, असे सांगून तरुणीला तो घरी येत तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच त्याने तिच्या नकळत व्हिडिओही काढला. त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल करायची धमकी देऊन तो गेली २ महिने सदर तरुणीला ब्लॅकमेल करुन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी एका १८ वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तिच्या १९ वर्षाच्या वर्ग मित्राला अटक केली आहे. ही घटना नोव्हेंबर २०२४ ते १२ जानेवारी २०२५ दरम्यान आरोपीच्या घरी व लॉजवर घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी हे एकाच कॉलेजमध्ये शिकत आहेत. आरोपी तरुणाने फिर्यादीला आईची भेट करुन देतो, असे सांगून तिचा विश्वास संपादन करुन आपल्या घरी आणले. त्यावेळी घरी कोणीही नव्हते. त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. तिच्या नकळत याबाबतचा व्हिडिओ काढून फिर्यादीला दाखविला. त्यानंतर मी ज्यावेळी बोलवीन, त्या वेळेस मला भेटायचे व याबद्दल कोणासही काही सांगायचे नाही़, असे म्हणून तिला वारंवार धमकाविले.
दरम्यान, तरुणी कॉलेजला गेली असताना तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन कॉलेजच्या वेळेमध्ये आरोपी दुचाकीवरुन लॉजवर घेऊन जात असे. तिच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवत कॉलेजला पुन्हा आणून सोडत असे. कोणालाही काही न सांगण्याची धमकी दिल्याने तरुणी खूप घाबरलेली होती, तिने हे कोणाला सांगितले नाही.
दरम्यान, १२ जानेवारी रोजी कॉलेजमध्ये आरोपीने सांगितलेले फिर्यादीने ऐकले नाही म्हणून कॉलेजच्या लायब्ररीमध्ये कानाखाली मारुन तिच्या हातातील बॅग फेकून मारली होती. गेली दोन महिने सुरु असलेल्या हा शारीरीक छळ असह्य झाल्याने या तरुणीने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. या मित्राने पोलीस अधिक तपास करत आहे.