(लांजा)
तालुक्यातील कोट आगरगाव येथील चिरेखाणीवर काम करणाऱ्या मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिवाजी इराप्पा धोत्रे (३१, रा. खंडापूर महादेवनगर, लातूर) असे त्यांचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली. मात्र, त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
शिवाजी धोत्रे हे पत्नी शांताबाई, मुलगी पूजा यांना घेऊन चार महिन्यांपूर्वी कोट येथे कामासाठी आले होते. त्यांना दारूचे व्यसन होते. पत्नी मुलीला घेऊन माहेरी कर्नाटक येथे गेली होती. बुधवारी रात्री ९:३० ते १ वाजेच्या दरम्यान त्यांनी बेडच्या लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत पोलिसांना माहिती मिळताच लांजा पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. शिवाजी धोत्रे यांच्या नातेवाइकांना याबाबत कल्पना देण्यात आली आहे. मात्र, त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण कळू शकलेले नाही. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल तेजस मोरे करीत आहेत.