(चिपळूण)
मुंबई-गोवा महामार्गावरील कामठे येथे रस्त्याचे बाजूला 22 चाकी कंटेनर उभा होता. मुंबई कडून वेंगुर्लाकडे जाणाऱ्या आयशर गाडीने या कंटेनरला धडक दिली. या जबरदस्त धडकेत आयशर गाडीच्या केबिनचा चक्काचूर झाला असून गाडीतील ऋतिक शिरोडकर व रामकृष्ण शेणई या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर अपघाताच्या घटनेची खबर मिळताच चिपळूण पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
ही घटना आज( गुरुवारी) पहाटे घडली आहे. या अपघातात वेंगुर्ले भटवाडी-किनळणे येथील आयशर चालक ऋत्विक शिरोडकर आणि वेंगुर्ले परबवाडा येथील मालक रामचंद्र (रामा) राजेंद्र शेणई मृत्यू झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे चिपळूण तालुकाध्यक्ष समीर काझी यांच्यासह शुभम कीलजे, अण्णा कुडाळकर, बंटी महाडिक, संतोष जावळे, सुदेश महाडिक, भाऊ लकेश्री, दशरथ खेडेकर, सार्थक महाडिक, शैलेश माटे आदी ग्रामस्थांनी घटनास्थळी गाव घेत आयशरच्या केबिनमध्ये अडकलेल्या दोघांना जेसीबीच्या साह्याने बाहेर काढून कामथे रुग्णालयात हलवण्यात आले आहे.