(गणपतीपुळे / वैभव पवार)
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या असलेल्या श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री लंबोदर गणपती मंदिराचे पुजारी डॉ. चैतन्य वासंती वामन घनवटकर यांचा उच्चशिक्षित खडतर प्रवास सध्या संपूर्ण गणपतीपुळे पंचक्रोशीतच नव्हे तर जिल्हाभरातून कौतुकास्पद ठरत आहे. डॉक्टर चैतन्य वामन घनवटकर यांनी रसायनशास्त्र अभ्यासक म्हणून विशेष प्राविण्य मिळवले आहे. तसेच त्यांनी पीएचडी पदवी संपादन केली आहे. उच्च शिक्षण आणि रसायनशास्त्रातील पीएचडी संपादन केल्यानंतर केल्यानंतर देश-विदेशातील मोठ्या पगाराच्या नोकरीच्या अनेक संधी चालून आल्या तरीही गणपतीपुळे येथील चैतन्य घनवटकर या तरुणाने मंदिरातील पुजारी म्हणूनच यापुढे कार्यरत राहायचे ठरवले आहे. तसेच कौटुंबिक परंपरा जपतानाच रसायन शास्त्राच्या क्षेत्रात किंवा देशासाठी काही वेगळे करण्याची संधी मिळाली तर ती साधण्याचा विचार हे चैतन्यच्या मनात आहे. चैतन्य यांना इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई (ICT Mumbai) येथे झालेल्या पदवीदान समारंभात डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. UGC संलग्नित – इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी म्हणजेच I.C.T. मुंबई ही सर्वोत्तम दर्जाची नामवंत युनिव्हर्सिटी म्हणून जगभरात ओळखली जाते.
रत्नागिरी मधील गोगटे जोगळेकर महाविद्यालयातून चैतन्य यांनी ऑरगॅनिक केमिस्ट्री विषयांतून पदव्युत्तर पदवी (BSc. ; MSc. पूर्ण केलेली आहे ) तत्पूर्वी जि. प. प्राथमिक शाळा गणपतीपुळे, फाटक हायस्कूल रत्नागिरी ह्या शाळेतून मराठी माध्यमातून त्यांचे शिक्षण झालेले आहे हे विशेष. मुंबई विद्यापीठाची आणि ICT ची – पी एच डी प्रवेश परीक्षा अश्या परीक्षा त्यांनी दोन्ही उत्तीर्ण केल्या आहेत आहे. डाऊ (Dow) केमिकल्स इंटरनॅशनल कम्पनीमध्ये व त्यांनतर DST प्रोजेक्ट मध्ये सुद्धा त्यांनी काम केलेले आहे. ह्या प्रोजेक्ट मध्ये पगारापेक्षा कमी फेलोशिप असूनसुद्धा रिसर्च च्या आवडीमुळे काम केले.
सुरुवातीला प्रकाश मोने यांनी राहण्याची सुविधा उपलब्ध केली. नन्तर रोहन बोन्द्रे, तेजस खटावकर, विशाल पाटील, प्रशांत कुलकर्णी, स्वप्निल ढमाले, मंदार जोशी, अंकित, पावसकर, शैलेश कानसरे, सौरभ वाडकर इत्यादी मित्रांसोबत भाड्याने खोली व जेवणही स्वतः केले घेतली. मुंबईत राहून खडतर प्रवास केला. पैसे वाचवण्यासाठी अनेकदा सकाळी नाश्ता न करता फक्त चहावरच ते राहत असत.
डॉ.श्री.घनवटकर चैतन्य वामन वासंती यांचा सहभाग असलेले १७ आंतरराष्ट्रीय शोधनिबंध म्हणजेच रिसर्च पेपर्स मोठ्या रिव्ह्यू प्रक्रियेनन्तर प्रकाशित झालेले आहेत. पी. एच डी शिक्षण चालू असतानाच भारत सरकार यांच्या एका औद्योगिक प्रकल्पामध्ये डॉ चैतन्य यांनी सहकारी वैज्ञानिकांसह एका भारतीय पेटंट प्रक्रियेसाठी सुद्धा काम केले आहे. ह्यामध्ये प्रोफेसर डॉ एन.सेकर यांचे मार्गदर्शन चैतन्य याना लाभले. Ph.D. चं वैशिष्ट्य म्हणजे चैतन्य याना आणि सोबतच्या विरेंद्र मिश्रा ह्याला research project आणि पी एच डी च्या कामाव्यतिरिक्त, project प्रेसेंटशन, मिटिंग अशी कामे सुद्धा करायची होती. ICT मुंबई मधील Dept. of Dyestuff Technology (आता, Dept of Speciality Chemicals) मध्ये संशोधनाचे काम केले. यावेळी चैतन्य चे मार्गदर्शक एन सेकर सर ह्यांनी विषय निवडायला मदत केली.Optical Biological properties and DFT studies of Heterocyclic colorants असे thesis title अंतिमतः ठरले. ह्यात Dyes molecules नव्याने तयार (synthesize) केले होते जे वरती म्हटलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रात research, test केले आणि त्यावर शोधनिबंध पब्लिश केले.
Biological activities, dyeing on fabric, antimicrobial activities of dyed fabric (रंगवलेले कापड) DFT studies अशी वेगवेगळ्या पद्धतीने research ची कामे केली. Chemistry मध्ये कठीण काम म्हणजे नवीन molecule बनवावे लागू शकतात. अन्य theoretical विषयात असे टप्पे असतीलच असे नाही. दिल्ली युनिव्हर्सिटी येथे झालेल्या यंग रीसर्चर्स सिम्पोसीअम (YRS 2019) मध्ये त्यांच्या रिसर्च व्याख्यानाला पारितोषिक मिळालेले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतला आहे. डॉ चैतन्य हे गोगटे जोगळेकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून लेक्चरर/ व्याख्याता म्हणून सुद्धा आवडीने उपस्थित रहातात. ह्यासोबत, ‘कीर्तन प्रवचन अभ्यासवर्ग (अ दर्जाच्या प्रमाणपत्र सह), हस्तरेषाशास्त्र, मंदिर स्थापत्य शास्त्र याचा सुद्धा वैविध्यपूर्ण अभ्यास डॉ चैतन्य यांनी कार्यशाळेद्वारे किंवा परीक्षा देऊन केला आहे.
महत्वाचे म्हणजे , धार्मिक व्यवस्थापनाच्या दृष्टीने नित्यविधी धार्मिक सुक्त इत्यादी शिक्षणाच्या संस्थान श्रीदेव गणपतीपुळे च्या 02 परीक्षा सुद्धा चैतन्य यांनी श्रींच्या आशिर्वादाने , कृपेने उत्तीर्ण केल्या आहेत असे त्यांनी सांगितले. आता संस्थानचे अधिकृत पुजारी म्हणून सेवेत आहेत. वैदिक धार्मिक शिक्षणाचे मार्गदर्शन कॉलेजच्या शिक्षणसोबत झाले. श्री रामदास फडके, चुलत भाऊ- श्री ओमकार घनवटकर, श्री ऋषिकेश कोल्हटकर गुरुजी यांच्याकडून आणि आधुनिक संसाधने वापरत वैदिक/धार्मिक शिक्षण पूर्ण केले.
डॉ चैतन्य यांना Ph.D. पदवी घोषित झाल्यावर सर्वप्रथम संस्थान श्रीदेव गणपतीपुळे येथे पंचकमिटी द्वारे सन्मान झाला आहे. श्री चंडिकादेवी संस्था गणपतीपुळे, ब्राह्मणसभा मालगुंड पंचक्रोशी, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, इत्यादी अनेक संस्थानी, सोबतच अनेक ग्रामस्थ यांनी घरगुती समारंभात, डॉ. चैतन्य घनवटकर यांचे सन्मान व कौतुक केले आहेत. वेदमूर्ती वासुदेव सदाशिव जोशी, यांच्या स्मरणार्थ, ब्राह्मणसभा मालगुंड येथे मानपत्र प्रदान करण्यात आले आहे.
गणपतीपुळे तसेच रत्नागिरी येथील देव , देश आणि धर्माच्या कार्यात,सामाजिक कार्यात सुद्धा त्यांचा सहभाग असतो.ओंकार घनवटकर , दत्तराज आणि निलेश यांच्या जोडीने वृक्षारोपण कार्य सुद्धा हाती घेतलेले आहे. पी एच डी चालू असताना श्रीराम चैत्रोत्सव मंडळाच्या माध्यमातून SIRF संस्थे द्वारे सैनिकांना ऑक्सिजन प्लॅन्ट साठी मदतीचे आवाहन करून मदत सुद्धा केली आहे.
ह्याचसोबत श्रीमंगलमूर्तींच्या सेवेत ते जवळपास गेल्या १२ वर्षांच्या आधीपासूनच लहानपणा पासून संधी मिळेल त्याप्रमाणे आहेत. हे सगळे करत असताना संस्थान श्रीदेव गणपतीपुळे चे अधिकृत पुजारी म्हणून श्रींच्या सेवेमध्ये डॉ चैतन्य घनवटकर वंशपरंपरा, श्रींचे सेवाकार्य घनवटकर बंधूंसोबत उत्तम पद्धतीने सांभाळत आहेत. श्रींच्या – मंगलमूर्तींच्या सेवेसोबतच श्रीधरस्वामी यांच्या पादुकांचे पूजन सेवा करण्याचे भाग्य सुद्धा डॉ चैतन्य याना लाभले आहे. श्री आनंद मराठे रत्नागिरी (गुरुकृपा परिवार) यांचे पाठबळ त्यांना मिळाले आहे.
श्री मंगलमूर्तींची, श्रींची , सद्गुरूंची कृपा व आशिर्वाद , आई – वडील , म्हणजेच सौ वासंती – श्री वामन घनवटकर यांचे, अनेक नातेवाईक, यांचे पाठबळ लाभले आहे. धार्मिक आणि वैज्ञानिक एकत्रित समन्वयाचे चिंतन व अभ्यास आणि मानसिकता ठेवली तर जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. आधुनिक शिक्षण आणि परंपरा यांचा मिलाफ विचारांना कालसुसंगत , तार्किक, चांगली व स्मार्ट दिशा देऊ शकतात असे डॉ चैतन्य यांनी आवर्जून सांगितले.