भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेला मोठं यश मिळाल आहे. चांद्रयान-३ ने २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले होते. इस्रोने आता माहिती दिली आहे की, इन-सिटू (इन सिटू) वैज्ञानिक प्रयोग सुरू आहेत. इन-सीटू मापनाद्वारे, रोव्हरवरील’लेझर-इंड्युस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप’ (LIBS) या उपकरणाने प्रथमच दक्षिण ध्रुवावर सल्फर स्पष्टपणे शोधले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरील दक्षिण ध्रुवावर सल्फर असल्याचे पुरावे प्रज्ञान रोव्हरने दिले आहेत. त्याशिवाय, इतर धातू आणि ऑक्सिजनचे प्रमाण आढळले आहे. रोव्हरकडून आता हायड्रोजनचा शोध सुरू आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजनबरोबच सल्फर, ॲल्युमिनियम, कॅल्शियम, लोखंड, क्रोमियम, टायटॅनियमही असल्याचेही आढळलं आहे. या सर्व मुलद्रव्यांचे पुरावे सापडल्यानं चांद्रयान मोहिमेला मोठं यश मिळाल्याचं म्हटलं जात आहे. हायड्रोजनचा मात्र अजूनही शोध केला जात आहे.
चांद्रयान ३ च्या लँडरने २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केल्यापासून प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर भ्रमण करत आहे. प्रज्ञान रोव्हरने संशोधना दरम्यान चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर (S )असल्याची पृष्टी केली आहे. प्रज्ञान रोव्हरवर असलेल्या लेझर-प्रेरित ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप (LIBS)अर्थात साधन मोजमाप पेलोडच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागावर विविध खनिजांचा शोध घेतला जात आहे. दक्षिण ध्रुवाजवळील चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर (एस) च्या असल्याची पुष्टी रोव्हरने केली आहे.
“इन-सीटू” मापनाद्वारे रोव्हरवरील ‘लेझर-इंड्युस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप’ या उपकरणाने प्रथमच दक्षिण ध्रुवावर सल्फर स्पष्टपणे शोधले आहे. ऍल्युमिनियम, कॅल्शियम, लोखंड, क्रोमियम, टिटॅनियम, मॅन्गेनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजनचा शोध आतापर्यंत लागला आहे. दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात धातू असल्याचे आढळून आले आहे. ‘एलआयबीएस’ नावाचा हा पेलोड बेंगळुरू येथील “इस्रो” च्या इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टम्स प्रयोगशाळेत विकसित केला गेला आहे.
रोव्हरने चंद्रावरील दक्षिण ध्रुवावरील मातीचे परीक्षण सुरू केले. इस्रोने मातीच्या तापमानाचा आलेखही शेअर केला आहे. आलेखामध्ये तापमान उणे १० अंश सेल्सिअस ते ५० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले.
Chandrayaan-3 Mission:
In-situ scientific experiments continue …..
Laser-Induced Breakdown Spectroscope (LIBS) instrument onboard the Rover unambiguously confirms the presence of Sulphur (S) in the lunar surface near the south pole, through first-ever in-situ measurements.… pic.twitter.com/vDQmByWcSL
— ISRO (@isro) August 29, 2023