( जाकादेवी /वार्ताहर )
रत्नागिरी तालुक्यातील जि.प केंद्रीय शाळा ओरी नं १ येथे लोक कल्याणकारी आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लक्षवेधी मिरवणुकीने उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवराय, माता जिजाऊ, शिवरायांचे मावळे अशा विविध भूमिका साकारल्या होत्या. शिवरायांची वेशभूषा शिवम संकेत देसाई याने तर माता जिजाऊ यांची वेशभूषा स्पृहा संकेत देसाई हिने साकारली होती. या मिरवणूकीत छत्रपती शिवरायांचा विद्यार्थ्यांनी अतिशय जल्लोषात जयघोष केला. शिवरायांच्या जयंती निमित विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनातील विविध प्रसंग आपल्या भाषणातून कथन केले.
शिवजयंतीनिमित सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री धनंजय आंबवकर, पदवीधर शिक्षिका सौ. समिक्षा पवार, श्री. गणपती पडुळे, अंगणवाडी सेविका व मदतनीसही उपस्थित होत्या. या दिवसाचे औचित्य साधून परिसर आवाराची साफसफाई करण्यात आली. शिवजयंती कार्यक्रम विद्यार्थी व शिक्षकांनी उत्साहात संपन्न केला.