(रत्नागिरी)
मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील द्वितीय वर्षातील सत्र ३ च्या विद्यार्थ्यांनी दि. १० जुलै २०२४ रोजी शास्वत मत्स्य बीज उत्पादन केंद्र खैरे- वलंग ता. महाड जि. रायगड येथे राष्ट्रिय मत्स्य शेतकरी दिन साजरा केला. त्यानिमीत्त विद्यार्थ्यांनी इंडियन मेजर कार्प माशांच्या बीज उत्पादन तंत्रज्ञानाची माहिती दिली व ऐन मत्स्य बीज उत्पादन हंगामामधे हा दिवस येत असल्याने या दिवशी प्रौढ़ नर व मादि माश्यांच्या जोड्या निवडून त्यांना प्रजनना साठी प्रेरित करण्यासाठी संप्रेरकाचे इंजेक्शन दिले. हे इंजेक्शन दिल्या नंतर काहि तासांतच मासे प्रजनन करून मोठ्या प्रमाणात् मत्स्य बीज निर्मिती केली .
10 जुलै 1957 हा भारतातील मत्स्य उत्पादकांसाठी एक संस्मरणीय दिवस आहे. याच दिवशी डॉ. हिरालाल चौधरी यांनी डॉ.अलीकुन्ही यांच्या सहकार्याने भारतीय प्रमुख कार्प माशांच्या प्रेरित प्रजननात (Hypophysation) पहिले यश संपादन केले होते. प्रमुख कार्प कल्चर क्षेत्राच्या सध्याच्या उत्कर्ष व भरभराटीचे श्रेय प्रा. चौधरी यांना जाते- ज्यांनी ‘प्रेरित प्रजनन प्रणाली’ सुरू केली. प्रमुख कार्प्सच्या प्रजननात कार्प पिट्यूटरी अर्काचा (Administration of carp pituitary extract) प्रणालीचा वापर केला आणि प्रणालीचे प्रमाणिकरण देखील केले. या प्रयोगातून तयार झालेले मत्स्यजिरे यशस्वीरित्या फ़्राय आणि नंतर फिंगरलिंगपर्यंत वाढविण्यात आले. या अग्रगण्य कार्यामुळे यानंतर मत्स्यबीज निर्मितीमध्ये दर्जेदार कार्प बिज उत्पादन वाढले आणि देशातील प्रजनन तंत्रज्ञानावर आधारित शेकडो हॅचरींमधून निर्मित मत्स्यबीजामूळे मत्स्यशेती करणा-या शेतक-यांना/मच्छिमारांना मोठा लाभ झाला.
या कार्यक्रमासाठी मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे सहाय्यक प्राध्यापक श्री- तौसिफ काझी, श्री- नीलेश मिरजकर् व सहाय्यक कर्मचारी श्री- दिग्विजय चोगले, श्री- अभिजित पाटिल आणि विद्यार्थी वर्ग हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष मोहिते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.