( लांजा )
माझे संविधान माझा अभिमान आगवे बौद्धिय मंडळ मुंबई ग्रामीण (रजि.) आम्रपाली महिला मंडळ जागृती मित्र मंडळ आणि लोकमान्य शिक्षण संस्था संचलित कै. रा. सि. बेर्डे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सापुचे तळे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने “माझे संविधान माझा अभिमान”कार्यक्रम दिनांक 26जानेवारी 2025 रोजी भारतीय प्रजाकसत्ताक 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये संविधान विषयी अभिमान जागृत व्हावा यासाठी मार्गदर्शक श्री.राहुल गीरी (युवा व्याख्याते व अभ्यासक) जिल्हा बीड यांनी मार्गदर्शन केले. श्री.केशव कांबळे व श्री. अनंत कांबळे यांच्या अध्यक्षते खाली कार्यक्रम पार पाडल, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. चंद्रकांत कांबळे (मार्गदर्शक),मुख्यद्यापक श्री. अनिल गुरव लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.देवेंद्र लोटणकर व संचालक मंडळ,विद्यालयातील शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले. सदर कार्यक्रमाला श्री. अविनाश कांबळे, श्री. चंद्रसेन कांबळे, व श्री. गणपत कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन श्री. रवींद्र कांबळे आणि अमोल कांबळे यांनी केले.
श्री. प्रफुल कांबळे (सरपंच आगवे ग्रामपंचायत), श्री. सिद्धार्थ कांबळे श्री.रमेश कांबळे, श्री.नारायण कांबळे, श्री.योगेश कांबळे, श्री. संदेश कांबळे, श्री. दशरथ कदम, श्री. सुधीर कांबळे, श्री. नरेश जाधव यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. विद्यार्थी वर्गात या कार्यक्रमामुळे उत्साह संचारला असून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.