सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा कोरोनाच्या दहशतीखाली आहे. देशात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता ही परीक्षा देखील रद्द केली जावी अशी मागणी विद्यार्थी व पालक वर्गातून होत आहे.
कोरोनाच्या सावटामुळे देशातील विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलं आहे. देशातील इतर महत्त्वाच्या अशा परीक्षाहीद्द करण्यात आल्या आहेत, तर काही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा देखील कोरोनाच्या सावटाखाली आहे. देशात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता ही परीक्षा देखील रद्द केली जावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान बोर्डाकडून अजून आठवडे तर सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती मिळते आहे. त्यानंतर पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा घ्यायच्या की रद्द करायच्या याबाबत निर्णय घेतला जाईल. शिक्षण मंत्रायलातील सूत्रांच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
मीडिया अहवालानुसार, परीक्षा रद्द करून असेसमेंट आधारीत योजना विद्यार्थ्यांसाठी आखली जाण्याची शक्यता आहे. शिक्षण मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.