(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड यांचे विद्यमाने जिल्हा रुग्णालय रत्नागिरी समता फाऊंडेशन मुंबई व ग्रामपंचायत कळझोंडी यांचे वतीने आरोग्य उपकेंद्र कळझोंडी येथे मोतीबिंदू तपासणी व मोतीबिंदू सदृश्य रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या वेळी 46 नागरिकांची नेत्र तपासणी जिल्हा रुग्णालयाचे डॉ. संदीप उगवेकर यांनी केली त्यातील 8 रुग्ण मोतीबिंदू सदृश्य आढळले आहेत. त्यांची येत्या बुधवारी जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड च्या वैद्यकीय अधिकारी डॉ मधुरा जाधव व डॉ. सुनिता पवार यांचे मार्गदर्शना खाली आरोग्य सहाय्यक डॉ परशुराम निवेंडकर यांनी विशेष मेहनत घेतली.
यावेळी समता फाऊंडेशन मुंबई चे वतीने नितेश शेट्ये, ग्रामपंचायत सदस्या अंजली शिंदे, ग्रामपंचायत सदस्य उदय अगोंडे ,सूर्यकांत बंडबे उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी समूह आरोग्य अधिकारी कळझोंडीच्या अक्षता शिर्सेकर, आरोग्यसेविका वीणा शिरगावकर, कळझोंडी येथील आशासेविका, मदतनीस यानी विशेष मेहनत घेतली.