(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कळंगुट येथे झालेल्या बोट अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी बोटचालक धारेप्पा झिराली (वय 42, रा. मूळ बेळगाव) आणि इब्राहीमसाब (34, रा. मूळ शिमोगा) यांना पणजी किनारी पोलिसांनी अटक केली आहे. बोट मालक मीना कुतिन्हो हिच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, बंदर कॅप्टन खात्याने या बोटीचा परवाना रद्द केला आहे.
कळंगुट समुद्र किनार्यावर बुधवारी दुपारी 12 च्या सुमारास वॉटर स्पोर्टस् करण्यासाठी पर्यटकांना समुद्रात घेऊन गेलेली बोट उलटली. यात खेड रत्नागिरी येथील सूर्यकांत पोफळकर (वय 45) यांचा बुडून मृत्यू झाला, तर त्यांच्या पाच वर्षीय मुलासह पाचजणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर गोवा वैद्यकिय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्रातील खेड येथील पोफळकर, चिंचविलकर व हंबीर कुटुंबांमधील 13 जण गोव्यात आले होते. कळंगुट समुद्रकिनार्यावर बोट बूक करून जलसफरीला गेले होते. अवघ्या 60 मीटरच्या अंतरावर ही बोट ओव्हरलोड झाल्याने वाळूत रुतून पडली. त्यात बोटीचे इंजिन बंद पडले. त्याच वेळेला मोठी लाट आल्याने बोट उलटली आणि त्याखाली हे पर्यटक अडकले. त्यापैकी 12 जणांना वाचवण्यात यश आला असून एकाचा बुडून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी बंदर कॅप्टन खात्याने या बोटीचा परवाना रद्द केला आहे. किनारी पोलिसांनी बोटीच्या मालक अॅन्थोनी कुतिन्हो आणि बोट चालक धारेप्पा झिराली (वय 42, रा. मूळ बेळगाव) आणि इब्राहीमसाब (वय 34, रा. मूळ शिमोगा) यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. ज्यामध्ये 20 हून अधिक पर्यटकांना कळंगुट बीचवर लाइफगार्ड एजन्सी दृष्टी मरीन लाईफसेव्हर्सने वाचवले. यामध्ये महाराष्ट्रातील खेड येथील 13 जणांच्या कुटुंबाचाही समावेश होता. या बोटीत 20 हून अधिक प्रवासी होते. किनाऱ्यापासून सुमारे 60 मीटर अंतरावर बोट उलटली आणि सर्वजण समुद्राच्या लाटांमध्ये अडकले.
या बोट अपघातात मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव सूर्यकांत पोफळकर (४५, रा. ऐनवरे, ता. खेड) असे आहे. मूळचे ऐनवरे गावातील असलेले सूर्यकांत पोफळकर हे मुंबई कर्ला येथे नोकरीनिमित्त कुटुंबासह वास्तव्यास होते. त्यांच्या पाच वर्षीय मुलीसह पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात सर्व जखमीवर उपचार सुरू आहेत.
खेड तालुक्यातील पोफळकर, चिंचविलकर व हंबीर या कुटुंबामधील १३ सदस्य नाताळच्या सुटीनिमित्त नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात आले होते. २५ डिसेंबरला सकाळी ११ च्या सुमारास १३ पर्यटकांना घेऊन जॉन वॉटर स्पोर्टस् ही पर्यटकांना जलसफर घडवणारी बोट समुद्रात गेली होती. समुद्र किनाऱ्यापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर या बोटचे इंजिन वाळूत रुतून इंजिन बंद पडले. त्याचवेळी समुद्राच्या लाटेची जोरदार धडक बसल्याने बोट पाण्यात कलंडली. या अपघातात पोफळकर हे चेहऱ्यावर मार लागल्यामुळे जखमी झाले होते. याच अवस्थेत त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोफळकर त्यांच्या एका भावाचाही १९९३ साली मुंबई बॉम्बस्फोटात मृत्यू झाल्याची अशी हृदयद्रावक आठवण ऐनवरे येथील ग्रामस्थांनी सांगितली.
लहान मुले व महिलांची सुटका
20 प्रवाशांपैकी 6 आणि 7 वर्षे वयोगटातील दोन मुले आणि 25 आणि 55 वयोगटातील दोन महिलांना वाचवण्यात आले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन प्रवाशांनी लाइफ जॅकेट घातले नव्हते. त्यामुळे त्यांना वाचवण्यात अडचणी आल्या.